IMPIMP

Ajit Pawar | परीक्षेला न बसताही डिग्री घेणारे…, अजित पवारांची उदय सामंतांच्या बोगस पदवी प्रकरणावर मिश्किल टिप्पणी

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar comment on uday samant bogus degree

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिंदे गटाचे (Shinde group) मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या पदवीच्या वैधतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सामंत यांची पदवी (Degree) बोगस असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून (Dnyaneshwar University, Pune) पदवी मिळवली असून हे विद्यापीठ मागील अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकरणावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. आमदार, उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री होण्यासाठी नियमांचा विचार केला जावा. अनेक नेत्यांकडे उच्च शिक्षण नसताना देखील त्यांनी चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. तसेच परीक्षेला न बसताही डिग्री घेणारे अनेक लोक आहेत, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. ते नागपूरमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आमदार, राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्यासाठी संविधानाने (Constitution) सांगितल्यानुसार आपण नियमांमध्ये बसतो का हे पहायचे असते. ज्यांच्या शिक्षणसंस्था असतात त्यांना डॉक्टरेट खूप मिळतात. ज्या अर्थी एखादा व्यक्ती संस्था, विद्यापीठ सुरु करत असेल त्या अर्थी ती व्यक्ती नक्कीच हुशार असते. यासंदर्भात मला टीका करण्याचा अधिकार नाही. काही लोकांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे डॉक्टरेट मिळते. काही लोकांना पदवी असते परंतु ते स्वत:कधी परीक्षेलाच बसलेले नसतात. आता कोण कशात मोडतं हे पाहण्यासाठी मी लक्ष घातले पाहिजे असे नाही.

 

ज्या व्यक्तीने जे शिक्षण घेतलेले आहे, त्या व्यक्तीने तसा अर्ज भरून द्यावा.
यामध्ये कमीपणा वाटण्याचे कारण नाही. कमी शिकलेल्या लोकांनी देखील चांगली कामे केल्याची उदाहरणे आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Former CM Vasantdada Patil) हे एक चांगले उदाहरण आहे. ते इयत्ता चौथी शिकले होते. मात्र चार वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. त्यांची प्रशासनावर पकड होती, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

उदय सामंत यांना आम्ही राष्ट्रवादीचे (NCP) युवक अध्यक्ष केले होते. आम्ही त्यांना आमदारकीचे तिकीट दिले.
त्यानंतर त्यांच्या मनात काय आले माहिती नाही पण ते शिवसेनेत (Shivsena) गेले.
नंतर शिंदे गटात गेले. कोणाला कोठे जायचे हा ज्याचा त्याचा निर्णय असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar comment on uday samant bogus degree

 

हे देखील वाचा :

Rohit Pawar | अनिल देशमुखांची अटक ही त्यांना राजकीय दृष्टीकोनातून अडचणीत आणण्यासाठीचीचं; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात…

Maharashtra Karnataka Border Dispute | मुंबईला केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘मुंबई कोणाच्या बापाची…’

Nashik Crime | सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR

Related Posts