IMPIMP

Rohit Pawar | अनिल देशमुखांची अटक ही त्यांना राजकीय दृष्टीकोनातून अडचणीत आणण्यासाठीचीचं; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात…

by nagesh
Rohit Pawar | anil deshmukh should have been released earlier rohit pawar

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – Rohit Pawar | काल ( दि. २७ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयची याचिका फेटाळून लावत त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळातून या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील या प्रकरणावर आपले मत स्पष्ट करत अनिल देशमुखांच्या अटकेची मागणी करणाऱ्या तत्कालीन विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, ‘अनिल देशमुखांची सुटका खरं तर आधीच व्हायला हवी होती, ती झाली नाही, मात्र न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. त्यानुसार काल तो निकाल आला. त्यामध्ये ज्या पध्दतीने ईडी आणि सीबीआयवर ताशेरे ओढलेले आहेत, हे सुध्दा आपण वाचलं पाहिजेत. स्वतःची चूक नसतानाही एका मोठ्या नेत्याला एवढा काळ तुरूंगात ठेवलं जातं. हे केवळ राजकीय दृष्टीकोनातून त्यांना अडचणीत आणण्यासाठीच, तर मग त्यांची सुटका होताना आज अनेक नेते त्या ठिकाणी जातील. त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करतील आणि राजकीय हितातून त्यांना जो त्रास झाला, येत्या काळात आम्ही लोकशाही पध्दतीने त्याच्या लोकांच्या हितासाठी आणि लोकशाही टिकावी यासाठी या प्रकरणाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.’

 

न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने देशमुख यांना जामीन मंजूर केल्यानंतर देखील गेल्या १६ दिवसांपासून अनिल देशमुख हे कारागृहात आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या विनंतीनंतर सुटकेच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल असे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी स्पष्ट केले होते. हीच मुदत काल ( दि. २७ डिसेंबर) रोजी संपली त्यानंतर परत एकदा सीबीआयने न्यायमूर्ती कर्णिक यांच्या एकलपीठासमोर धाव घेतली.

 

सर्वोच्च न्यायालयास नाताळाची सुट्टी असल्यामुळे याचिका सुनावणी येऊ शकली नाही.
त्यामुळे स्थगितीस ३ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी सीबीआयने केली होती.
न्यायमूर्ती कर्णिक यांनी स्थगिती एका आठवड्याने वाढवली.
त्याचवेळी ही शेवटची मुदतवाढ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी ही मुदत संपत आल्याने सीबीआयने न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांच्या सुट्टीकालीन
एकलपीठाकडे धाव घेतली. पण या प्रकरणी आधीच मुदतवाढ दिल्याने न्यायमूर्तींनी सीबीआयची याचिका
फेटाळून लावली. या प्रकरणी केवळ ऐकिव माहितीच्या आधारावर हे प्रकरण नोंदवले गेल्याची देखील
प्रतिक्रिया न्यायमूर्तींनी दिली. (Rohit Pawar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rohit Pawar | anil deshmukh should have been released earlier rohit pawar

 

हे देखील वाचा :

Maharashtra Karnataka Border Dispute | मुंबईला केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘मुंबई कोणाच्या बापाची…’

Nashik Crime | सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR

Pune Crime | लिलाव भिशीतून चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने 70 लाखांची फसवणूक

Related Posts