IMPIMP

Ajit Pawar | ‘माझ्याशी रक्ताचं नातं म्हणून माझ्या 3 बहिणींच्या घरावर छापे टाकले याचं वाईट वाटतं’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar it raids i feel bad my sisters house was raided only because blood relation with me

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकवर्तीयांच्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आयकर विभागाने (Income Tax Raid) छापे टाकले आहेत. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या तीन बहिणींच्या घरावर देखील छापेमारी करण्यात (IT Raids Sisters House) आली. यावर प्रतिक्रीया देताना अजित पवार यांनी केवळ रक्ताचं नात म्हणून बहिणींच्या घरावर छापेमारी केली याचं वाईट वाटलं, अशी प्रतिक्रीया दिली. ते मुंबईत बोलत होते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राज्यातील दौंड शुगर (Daund Sugar), अंबालिका शुगर्स (Ambalika Sugar), जरंडेश्वर (Jarandeshwar), पुष्पगनतेश्वर (Pushpaganteshwar), नंदुरबार या कारखान्यांच्या संचालकांच्या (factory directors) घरावर आयकर विभागाने छापे टाकले. या सर्व कारखान्यांचे संचालक अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली.

 

माझ्या तीन बहिणींचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. त्यांचा कोणत्याही कंपन्यांशीही संबंध नाही.
त्या लग्न करुन त्यांच्या त्यांच्या घरी सुखात संसार करत आहेत.
तरी माझ्याशी नातं असल्याने त्यांच्या घरावर छापे मारले याचे वाईट वाटतं.
माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचे आयकर वेळच्या वेळी भरले जातात.
त्याची मी स्वत: काळजी घेत असतो. कोणताही कर चुकवत नाही, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आयकर विभागाने टाकलेल्या धाडी राजकीय हेतूनं प्रेरित आहेत का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले,
माझ्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर आणि माझ्या बहिणींच्या घरावर टाकलेले छापे हे राजकीय हेतूनं टाकली इतर कोणत्या हेतूनं ते आयकर विभागालाच विचारा, अस पवार यांनी म्हटले.
तसेच आजवर एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण कधी पाहायला मिळालं नव्हतं.
महाराष्ट्रात सत्तेचा गैरपावर कधीच पाहायला मिळाला नाही. पण जे काही सुरु आहे ते जनता बघत आहे, असंही पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar it raids i feel bad my sisters house was raided only because blood relation with me

 

हे देखील वाचा :

PAN Aadhaar Linking | सर्व PAN, Aadhaar कार्डधारकांसाठी आवश्यक ! तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान

Jayant patil | अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत

Pune Navratri Mahotsav | पुणे नवरात्रौ महोत्सव प्रारंभ ! बागुल कुटुंबीयांतर्फे घटस्थापने दरम्यान लक्ष्मीमातेस 25 किलोची चांदीची साडी अर्पण

 

Related Posts