IMPIMP

Ajit Pawar | ‘कुत्र्याचे लाड घरीच करा, त्याला गादीवर…’, तळजाई टेकडीवरील घाणीवरुन अजित पवारांचा पुणेकरांना टोला

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 cm eknath shinde reply opposition leader ajit pawar over maharashtra karnataka border issue

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनउपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (दि.26) पुण्यातील तळजाई टेकडीची (Taljai Hill) पाहणी
केली. यावेळी टेकडीवरील घाणीवरुन (Dirt) त्यांनी पुणेकरांना टोला (Taunts Punekar) लगावला. तळजाई टेकडीवर येताना कुत्रे (Dog) घेऊन येऊ
नका, त्यांचे लाड घरीच करा, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. टेकडीवरील वन उद्यानातील (Forest Park) विकासकामांचं शनिवारी सकाळी
अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी टेकडीवरील घाणीवरुन पुणेकरांना टोला लगावला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, टेकडीवर तुम्ही फिरायला या, पण तुमच्यासोबत तुमचे कुत्रे लाडाने घेऊन येऊ नका. त्याचे घरी काय लाड करायचे ते करा, घरी गादीवर झोपवा आम्हाला काही देणं – घेणं नाही. तुमच्या मुलांपेक्षा कुत्र्याला जास्त सांभाळा, आमचं काहीही म्हणणं नाही. पण त्या कुत्र्याला टेकडीवर घेऊन येऊ नका. ते पुढे म्हणाले, कुत्र्यांमुळे टेकडीवर घाण होते, त्यामुळे फिरायला येताना फक्त तुम्ही या, तुमचे कुत्रे आणू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

 

 

दरम्यान, यावेळी भाजपच्या (BJP) सरकार पाडण्याच्या दाव्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या सव्वा दोन वर्षापासून भाजपकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहे. जोपर्यंत 145 ची मॅजिग फिगर (Magig Figure) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पाठिशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी (Sonia Gandhi), शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांचे तीन पक्ष एकत्र आहेत, तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar taunts punekar over from dirt on taljai hill

 

हे देखील वाचा :

Success Square Kothrud | सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या स्वप्नपूर्ती कोनशिलेचे अनावरण

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 176 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Street Food Indian Cities | स्ट्रीट फूड शौकिनांसाठी नंदनवनापेक्षा कमी नाहीत, भारतातील ही ६ शहरे

Lavasa Project | ‘लवासा प्रकल्पात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय’ – उच्च न्यायालय

 

Related Posts