IMPIMP

Street Food Indian Cities | स्ट्रीट फूड शौकिनांसाठी नंदनवनापेक्षा कमी नाहीत, भारतातील ही ६ शहरे

by nagesh
Street Food Indian Cities | street food of these 6 indian cities is a paradise for foodies

सरकारसत्ता ऑनलाइन – भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथील प्रत्येक राज्याला वेगळी खाद्यसंस्कृति (Food Culture) आहे. त्यातल्या काही खाद्याचे प्रकार स्ट्रीट फूड (Street Food) या सदरात मोडतात. भारतातील (Street Food Indian Cities) प्रत्येक शहरात आपल्याला खाण्यासाठी काहीतरी खास सापडेल. रस्त्यावरच्या जीवनातून आणि तिथल्या खाण्या – पिण्यावरून तुम्हाला शहराबद्दल (Street Food Indian Cities) सगळं काही कळू शकतं. येथे येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला स्ट्रीट फूडच्या माध्यमातून शहराची ओळख करून देऊया.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लखनऊ (Lucknow)  – उत्तर प्रदेशातील (Lucknow – Uttar Pradesh) हे ऐतिहासिक शहर खाद्यप्रेमींच्या यादीतही वरचे आहे. कारण येथे रस्त्यावरचं जेवण अप्रतिम आहे. येथे तुम्हाला अद्भुत टुंडेच्या कबाबपासून (Tunday Kabab) विविध प्रकारची बिर्याणी (Biryani) आणि शाकाहारी पदार्थ (Vegetarian Foods) देखील मिळतील (Street Food Indian Cities).

 

दिल्ली (Delhi) – दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर आहे आणि स्ट्रीट फूड हे येथील वैशिष्ट्य आहे यात शंका नाही. येथे मिळणारे चाटचे (Chaat) प्रकार तुम्हाला नक्कीच आवडतील. तसेच इथले प्रसिद्ध गोलगप्पा (Panipuri) तुम्ही कुठेही खाऊ शकता. याशिवाय चोले भटुरे (Chole Bhature), विविध प्रकारची बिर्याणी तुम्ही शहरभर ट्राय करू शकता. दिल्ली मोमोजसाठीही प्रसिद्ध आहे.

 

कोलकाता (Kolkata) – या शहराला तुम्ही स्ट्रीट फूडचा राजा म्हणू शकता. प्रत्येकाचा आवडता पदार्थ येथे सहज उपलब्ध होतो.
चायना टाऊनच्या बाओपासून ते रस्त्यावर मिळणार्‍या स्वस्त बंगाली पदार्थापर्यंत आणि कठड्याच्या रोल्सपर्यंत या सगळ्या गोष्टी येथे मिळतात.
तसेच पुचका आणि इथे मिळणार्‍या मिठाईचा (Sweets) आनंद घ्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अमृतसर (Amritsar) – शिखांसह सर्व हिंदू समाजासाठी पवित्र असलेल सुवर्ण मंदिर या पंजाबमधील अमृतसर शहरात आहे, येथील स्ट्रीट फूड फारच प्रसिद्ध आहे.
इथला प्रसिद्ध अमृतसरी कुल्चा (Amritsar Kulcha) जरूर खावा आणि त्याबरोबर मोठ्या प्रमाणात लस्सी (Lassi) प्यायला हवी.
हिवाळ्यात येथे गेल्यास कॉर्न ब्रेड (Cornbread) आणि मोहरीच्या हिरव्या भाज्याही खाव्यात. नॉनव्हेजची आवड असेल तर बटर चिकन (Butter Chicken), चिकन टिक्का (Chicken Tikka) यासारख्या गोष्टीही ट्राय करता येतील.

 

मुंबई (Mumbai) – महाराष्ट्रातील (Maharashtra) हे शहर कदाचित बॉलीवूडच्या ग्लॅमरसाठी ओळखले जाते.
पण तेवढेच प्रसिद्ध आहे ते स्ट्रीट फूडसाठी ! येथील विविध उपनगरे एक से एक खाऊगल्लींसाठी प्रसिद्ध आहेत.
येथील वडापाव (Vada Pav) आहाहा, तो खाल्ल्याशिवाय आपण मुंबई पाहिलीच नाही असे वाटेल.
कारण शहराच्या कानाकोपर्‍यात तुम्हाला वडापाव मिळेल.
याशिवाय मिसळ पाव (Misal Pav), बॉम्बे सँडविच (Bombay Sandwich) आणि पारसी फूडही (Parsi Food) अप्रतिम मिळते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मदुराई (Madurai) – या शहराला तमिळनाडूचा (Tamil Nadu) आत्मा म्हटले जाते.
मदुराईचे रस्ते अप्रतिम आहेत, तुम्हाला इथे अनेक प्रकारचे अन्न मिळेल.
विविध प्रकारच्या डोशापासून (Dosa) ते इडली (Idli) आणि नॉन व्हेज फूडपर्यंत (Non-veg Food) तामिळनाडूतील हे शहर खाण्याची आवड असणार्‍यांसाठी उत्तम आहे.

 

Web Title :-  Street Food Indian Cities | street food of these 6 indian cities is a paradise for foodies

 

हे देखील वाचा :

Lavasa Project | ‘लवासा प्रकल्पात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय’ – उच्च न्यायालय

Bank Officer Suicide Case | ‘बँक ऑफ न्यूयॉर्क’च्या महिला ऑफिसर आत्महत्येप्रकरणी पुणे कनेक्शन आलं समोर, प्रियकरला अटक

Benefits Of Papaya | …म्हणून पपईला म्हंटलं जातं सुपरफूड, जाणून घ्या शरिरास होणार्‍या आश्चर्यकारक फायद्यांबाबत

 

Related Posts