IMPIMP

Lavasa Project | ‘लवासा प्रकल्पात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय’ – उच्च न्यायालय

by nagesh
Kolhapur Crime | cousin raped by breaking into the house in broad daylight 30 year old nephew sentenced to 10 years kolhapur

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Lavasa Project | लवासा प्रकल्प पर्यावरण नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर हायकोर्टाने (High Court) निकाल दिला आहे. या निकालामध्ये लवासा प्रकल्पाबाबतचे (Lavasa Project) आरोप योग्य मात्र ते करायला उशिर झाल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. यासंदर्भात नानासाहेब जाधव या वकिलांनी हायकोर्टात याचिका (Petition) दाखल केली होती. प्रकल्पात शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय असं देखील न्यायालयानं सांगितलंय.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या याचिकेमध्ये लवासा प्रकल्प हा कशा पद्धतीने बेकायदेशीर (Illegal) आहे, कृष्णा खोऱ्यातील जमीन या प्रकल्पासाठी देण्यात आली त्यासोबतच कशा पद्धतीने कायद्यामध्ये बेकायदेशीर तरतुदी करून प्रसंगी हा प्रकल्प उभा करण्यात मान्यता देण्यात आली. अशा प्रकारचे आरोप नानासाहेब जाधव (Nanasaheb Jadhav) यांनी केले होते. मात्र गेली अनेक वर्षे हायकोर्टात ही याचिका प्रलंबित होती. याचिकेच्या सुनावणीपुर्वी जवळपास नऊ न्यायमुर्तींनी आणि खंडपीठांनी या याचिकेवर सुनावणीस नकार दिला. त्यामुळे नोव्हेंबर 2013 आणि 2018 नंतर ही याचिका नव्याने दाखल करण्यात आली. अखेरीस आज म्हणजे 2022 मध्ये या याचिकेवर निकाल आलेला आहे. (Lavasa Project)

 

या याचिकेमध्ये नानासाहेब जाधव यांनी जे काही आरोप केले होते ते कुठेतरी आम्हाला योग्य वाटत आहेत. कारण त्यासंदर्भात पुरावेही आहेत. जेणेकरून या प्रकल्पामध्ये ज्या सुविधा राबवायला हव्या होत्या त्या राबविण्यात आल्या नाहीत. पवार कुटुंबियांच्या (Pawar family) जवळच्या एका कंपनीला या प्रकल्पाचं कंत्राट (Contract) कोणत्याही निविदा प्रकियेविना देण्यात आलं होतं. मात्र आता इतक्या वर्षांनंतर जे काही बांधकाम झालं आहे ते पाडण्याचे आदेश आता देता येणार नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, लवासा प्रकल्पामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि
त्यांच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांचं स्वारस्य असल्याचंही हायकोर्टाने (High Court) सांगितलं आहे.

 

Web Title :- Lavasa Project | lavasa project high court Nanasaheb Jadhav sharad pawar supriya sule

 

हे देखील वाचा :

Bank Officer Suicide Case | ‘बँक ऑफ न्यूयॉर्क’च्या महिला ऑफिसर आत्महत्येप्रकरणी पुणे कनेक्शन आलं समोर, प्रियकरला अटक

Benefits Of Papaya | …म्हणून पपईला म्हंटलं जातं सुपरफूड, जाणून घ्या शरिरास होणार्‍या आश्चर्यकारक फायद्यांबाबत

Pune Crime | अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून उकळली 10 लाखांची खंडणी, आरोपीला चतु:श्रृंगी पोलिसांकडून अटक

 

Related Posts