IMPIMP

Ajit Pawar | पुणे विकासावर अजितदादांची सर्व पक्षीयांना साद; म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar comment on anjali damania claim about going with bjp

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – Ajit Pawar | पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांचा वाढता विस्तार पाहता पायाभूत सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होत आहे. शहरांच्या या वाढत्या लोकसंख्येसोबतच सोयीसुविधांमध्ये देखील वाढ होण्याची नितांत गरज आहे. हिंजवडीसारख्या औद्योगिक नगरीतील उद्योगांचे स्थलांतर होऊ लागले आहे. राज्यातील युवकांच्या नोकरीचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड ही महत्वाची शहरे असून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तेथील लोकप्रतिनिधींची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेऊन या शहरासंबंधीचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत बोलताना केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित चर्चेत त्यांनी भाग घेतला. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, पुणे तसेच पिंपरी चिंचवड ही राज्यातील महत्वाची शहरे असून तिथल्या वाहतूक, पिण्याचे पाणी, कायदा व सुव्यवस्था, उद्योगपुरक वातावरण आदी प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यांची जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात यावी. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. शहरांच्या विकासासाठी विरोधी पक्ष सरकारला संपूर्ण सहकार्य करतील अशी ग्वाही यावेळी बोलताना अजित पवारांनी दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत यांना विरोधीपक्षनेत्यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

 

दरम्यान, राज्याचे हिवाळी अधिवेशन हे मंत्र्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चांगलेच तापले आहे.
आजही राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या
राजीनाम्याची मागणी केली. सत्तारांवर वाशिम येथील बेकायदा जमीन हस्तांतरणाचे आरोप आहेत.
दरम्यान या मुद्यावर राज्य सरकार सत्तारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधीपक्षाने केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | all parties should put politics aside and come together and provide facilities to the growing population of pune ajit pawar

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!, ‘स्वधार’ सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्याची फडणवीसांची घोषणा

Shruti Haasan | श्रुती हासनने सिनेसृष्टी बद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली “मी कधीही दिखावा केला नाही…”

Uddhav Thackeray | त्यांची नजर वाईट आहे, त्यामुळे आरएसएसने काळजी घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालय भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य…

 

Related Posts