IMPIMP

Ajit Pawar | ‘द काश्मिर फाईल्स’ ! अजित पवारांनी रोखठोक उत्तर दिल्यानंतर भाजप आमदारांनी धरला थेट बाहेरचा रस्ता ?

by nagesh
Ajit Pawar | bjp mp sujay vikhe patil allegation on ajit pawar controversial statement about chhatrapati sambhajiraje

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमा टॅक्स फ्री (Tax Free Kashmir Files) करावा अशी मागणी भाजपने (BJP) सभागृहात केली. ही मागणी लावून धरत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या उत्तरानंतर विरोधक सभागृह त्याग करत बाहेर पडले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट गाजत असल्याचं दिसत आहे. यावरून चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी भाजपने केली. मात्र केंद्र सरकारने (Central Government) चित्रपट टॅक्स फ्री करावा म्हणजे तो देशभर टॅक्स फ्री होईल, असं अजित पवार म्हणाले. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हरकत घेतली मात्र अजित पवार यांचे भाषण सुरू असल्यामुळे अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही म्हणून भाजप नेत्यांनी सभात्याग केला.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह (Pen Drive) सादर करत दुसरा बॉम्ब फोडला होता. मात्र अजित पवार यांनी यावर बोलताना यातील हवाच काढुन टाकली. फडणवीस यांनी सादर केलेल्या संभाषणामधील दोन व्यक्तींमधील डॉ. मुदाससीर लांबे यांची नियुक्ती 31/08/19 ला झाली होती आणि नियुक्ती 12 सदस्य असते. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते आणि मागील सरकारमध्ये शिवसेना होती परंतु त्यांना किती अधिकार होते माहितच आहे त्यामुळे यात कुठलेही तथ्य नसल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, आमदारांचा विकास निधी (Development Fund) चार कोटीवरून पाच कोटी केला आहे.
तो पुढील वर्षापासून मिळणार आहे. आमदारांच्या चालकांना 15 हजाराचा 20 हजार, सचिवाला 25 हजाराहून 30 हजार करण्यात येत आहे,
अशी घोषणाही अजित पवार यांनी केली आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | central government should make kashmir files tax free say ajit pawar

 

हे देखील वाचा :

IND vs PAK | मोठा अनर्थ टळला ! भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानही क्षेपणास्त्र डागणार होता, पण…

Pune Crime | ‘फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू’, महिलेला धमकावणाऱ्या पती-पत्नीवर FIR

New IPL Rules | आता संघाकडे असणार इतके DRS, फायनल मॅचची सुपर ओव्हरही टाय झाली तर…; आयपीएलच्या नियमांमध्ये झाले मोठे बदल!

 

Related Posts