IMPIMP

Ajit Pawar On Marathi Language | ‘इकडं येऊन पैसे कमवता आणि मराठी पाट्यांना विरोध करता’; अजित पवारांनी खडसावले !

by nagesh
Maharashtra MLC Election 2022 | maharashtra vidhan parishad election strategies to turn independents towards ncp ajit pawar made it clear

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar On Marathi Language | राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाचं नामफलक (Nameplates
In Marathi) हे मराठी भाषेत असावं असा कायदा आणला आहे. मात्र याला काही व्यापाऱ्यांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली आहे. याच
पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar On Marathi Language) मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना खडसावलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आपल्याच मुंबापुरीत यायचं दोन पैसे कमवायचे त्यानंतर आपल्या राज्यात हे पैसे पाठवायचे आणि वर मराठीला (Marathi Language) विरोध करायचा, असं करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मराठी भाषा भवन केंद्राच्या भूमिपुजनावेळी ते बोलत होते.

 

महाराष्ट्रात (Maharashtra) राहायचं, मराठी भाषेला विरोध करायचा हे नैतिक ढोंग काही जण करतात. राज्यात येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला, माणसाला विरोध का करता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत या मातीचे ऋण विसरू नका ?, असा सवाल अजित पवारांनी केला.

 

दरम्यान, मराठी भाषा भवनासाठी जेवढ्या निधीची (Fund) गरज आहे तेवढा निधी देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. मराठी भाषा भवनासाठी सरकार प्रयत्न करत राहिले, अनेक अडचणी आल्या पण आता मराठी भाषा केंद्राचं मुख्य केंद्र (Main Center) मुंबईत आणि उपकेंद्र नवी मुंबईत उभं राहत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

 

Web Title :- Ajit Pawar On Marathi Language | ajit pawar hits back to who oppose marathi language in mumbai maharashtra

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | ‘ऊसापासून साखर असा विचार करून चालणार नाही आता…’; शरद पवारांचा बळीराजाला ‘हा’ मोलाचा सल्ला !

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी ! DA च्या नंतर HRA वाढणार काय ? तसं झालं तर होईल 20484 रूपयांचा फायदा

Women Health | वाढत्या वयानुसार महिलांनी ‘या’ प्रकारच्या होणाऱ्या बदलांविषयी जागृक असणे आहे गरजेचे !

 

Related Posts