IMPIMP

Ajit Pawar | ‘ZP आणि खासगी शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे’; अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश

by nagesh
Ajit Pawar | bjp mp sujay vikhe patil allegation on ajit pawar controversial statement about chhatrapati sambhajiraje

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांबाबत (Teacher’s Salary) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
‘राज्यातील जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे,
त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात,’
असे आदेश अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक पार पडली.
त्यावेळी राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
या बैठकीस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), आमदार कपिल पाटील (Kapil Patil),
आमदार अभिजीत वंजारी (Abhijeet Vanjari), वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Sounik),
विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे (Neeraj Dhote) आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक,
उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे.
शिक्षकांच्या वेतनासाठी विलंब होणे चुकीचे आहे. शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून केले जाते.
या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणातील त्रूटींमुळे वेतन अदा करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभाग आणि वित्त विभागाने समन्वयाने काम करावे, यंत्रणातील त्रुटी दूर करुन आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा कराव्या,” असं ते म्हणाले.

 

Web Title :-  Ajit Pawar | orders given by ajit pawar for timely payment of salaries to teachers and non teaching staff in zilla parishad and private schools

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya on INS Vikrant | नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्यांनी व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर केला घणाघात, म्हणाले…

Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या; कात्रज परिसरातील घटना

UP MLC Election Result 2022 | युपी विधान परिषदेतही भाजपचा मोठा विजय

 

Related Posts