IMPIMP

Ajit Pawar | अजित पवार भाजपसोबत येणार का? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘फक्त अजित पवारच नाही तर…’

by nagesh
Barsu Refinery Project | barsu project controversy ajit pawar reaction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा
राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) सुरु आहे. त्यातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
(Union Home Minister Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्याबाबतीत वेगवेगळे नेते आपली प्रतिक्रिया देत
असताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजप नेते भागवत कराड (Bhagwat Karad) यांना यासंदर्भात विचारण्यात आले. त्यावर कराड म्हणाले, फक्त
अजित पवारच (Ajit Pawar) नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) अस्वस्थता आहे.

 

भागवत कराड एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांना अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना कराड म्हणाले, फक्त अजित पवारच नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. तसेच राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसमध्येही (Congress) तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे 15 आमदार आहेत, त्यांच्यातही अस्वस्थता असल्याचे कराड यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भागवत कराड पुढे म्हणाले, या तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेमागचं कारण म्हणजे तिकडे एकमेकांचं संगोपन नाही, एक विचार नाही. प्रत्येक आमदाराला वाटतं आपली कामं व्हावी, परंतु त्यांच्या सरकारच्या काळातही ते झालं नाही.
त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मी अभिनंदन करेन. या नेत्यांनी राज्यात चांगली कामं केली आहेत.

 

 

Web Title :- Ajit Pawar | union minister and bjp leader bhagwat karad says political unrest in ajit pawar ncp and congress

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द, बावनकुळेंचे दिल्लीतून मोठं विधान म्हणाले…

Pune Crime News | पुणे-घोरपडे पेठ क्राईम न्यूज ! खडक पोलिस स्टेशन : पुर्ववैमनस्यातून बेदम मारहाण करणार्‍या चौघांविरूध्द गुन्हा

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | पुणे : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘रोजा इफ्तार’, संवाद कार्यक्रम

 

Related Posts