IMPIMP

Maharashtra Political News | अजित पवारांचे पुण्यातील कार्यक्रम रद्द, बावनकुळेंचे दिल्लीतून मोठं विधान म्हणाले…

by nagesh
Maharashtra Political News | chandrashekhar bawankule on alliance with ajit pawar and ncp in delhi

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | मागील अनेक दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP)
जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच सोमवारी अजित पवार यांनी आपले पुण्यातील सर्व कार्यक्रम (Maharashtra Political
News) अचानक रद्द केले. ते सासवड येथे शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
(Chandrashekhar Bawankule) हे दिल्लीला गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली
आहे.

 

दिल्लीत माध्यमांनी अजित पवारांनी पुण्याचे दौरे रद्द केलेत? असं विचारलं असता बावनकुळे म्हणाले, याबद्दल मला काहीच माहिती नाही. अजित पवारांच्या भूमिकेवर (Maharashtra Political News) प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. त्यामुळे मला कोणतीही माहिती नाही. अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करणार का? असे विचारले असता ते म्हणाले, अशा चर्चा खूप होत असतात, जर तर ला जीवनात अर्थ नसतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार भाजपत आल्यावर स्वागत करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, देव, देश आणि धर्म ही आमची काम करण्याची पद्धत आहे. कालपर्यंत कोणत्या विचारधारेत होता, माहिती नाही. पण, आमच्या पक्षात आल्यावर विचारधारेच्या आधारावरच काम करावं लागतं. पंडित दीनदयाळ उपाध्याय (Pandit Deendayal Upadhyay) यांचा संकल्प आम्हाला पूर्ण करावा लागतो. त्यामुळे आमच्या विचारधारेशी सहमत असला, तर आमचा विरोध नाही. बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

 

भाजपमध्ये प्रत्येक बुथवर 25 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आम्ही घेत आहोत. 30 एप्रिलच्या ‘मन की बात’ कार्यक्रमापर्यंत 25 लक्ष पक्ष प्रवेश भाजपात होणार आहेत. हा महिना संपूर्ण पक्षप्रवेशाचा असणार आहे. 1 लक्ष बुथवर आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. राज्यातील 700 पदाधिकारी प्रत्येक बुथवर जात आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

 

Web Title :-  Maharashtra Political News | chandrashekhar bawankule on alliance with ajit pawar and ncp in delhi

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे-घोरपडे पेठ क्राईम न्यूज ! खडक पोलिस स्टेशन : पुर्ववैमनस्यातून बेदम मारहाण करणार्‍या चौघांविरूध्द गुन्हा

Pune Water Supply | पुणे महानगरपालिका : मंगळवारी हिंगणे, विश्रांती नगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी, राजयोग सोसायटी इत्यादी भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Crime News | पुणे-धनकवडी क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – पामोलिन कुत्र्याचा तु पाय मोडला आहेस म्हणत मारहाण

 

Related Posts