IMPIMP

Ambadas Danve | संजय राऊत पुन्हा नव्याने महाराष्ट्रात मोठा लढा उभा करतील – अंबादास दानवे

by nagesh
Maharashtra Politics Issue | | ambadas danve comment on maharashtra political crisis next hearing on 14th feb

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बाहेर प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.

 

मागील तीन चार महिन्यांपासून आमची भेट नव्हती. त्यामुळे मी त्यांची आता भेट घेतली आहे. यावेळी राजकारण आणि इतर गप्पा केल्या. येणाऱ्या काळात संजय राऊत शिवसेना (Shivsena) नेते म्हणून महाराष्ट्रात मोठा लढा उभा करतील. तेजस ठाकरे (Tejas Thackeray) राजकारणात येणार की नाहीत, हा सर्वस्वी त्यांचा आणि पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. महाराष्ट्र आणि देशात संजय राऊत यांची प्रतिमा लढाऊ नेता म्हणून आहे. महाराष्ट्रत गद्दारी करुन, ईडी आणि विविध राष्ट्रीय यंत्रणा वापरुन सरकार पाडण्यात आले आणि विरोधी पक्षातील नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यांची अटक बेकायदेशीर होती. न्यायलयाने देखील ईडीला तडाखा लावला आहे, असे अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून आम्ही सर्व एक आहोत.
महाविकास आघाडीचे उद्दीष्ट एक आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)
‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रेत सहभागी झाले आहेत. मी देखील या यात्रेत सहभागी होणार आहे.
राहुल गांधी भारत जोडो ही चांगली संकल्पना घेऊन निघाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सोबत करणार आहोत.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अंतर्मुख होण्याची गरज आहे, असे म्हटले होते.
त्यावर देखील दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनाच अंतर्मुख होण्याची गरज पडेल, असे दानवे म्हणाले आहेत.

 

 

Web Title :- Ambadas Danve | Sanjay Raut will once again put up a big fight in Maharashtra

 

हे देखील वाचा :

Anil Bonde | संजय राऊतांना उशिरा सुचलेले शहाणपण, अनिल बोंडेंचा खोचक टोला

Pune News | पुण्याजवळील चाकण येथील ‘या’ किल्ल्यावरील हटवले अतिक्रमण

Hostel Daze | दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या शेवटच्या सीरिजचा ट्रेलर रिलीज

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण

 

Related Posts