IMPIMP

Hostel Daze | दिवंगत कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या शेवटच्या सीरिजचा ट्रेलर रिलीज

by nagesh
Hostel Daze | hostel daze trailer raju srivastava makes his last appearance

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम : 2019 मध्ये अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘हॉस्टेल डेज’ (Hostel Daze) हि वेब सिरीज प्रदर्शित झाली होती. हि सिरीज खूप फेमस झाली होती. या सिरीजमध्ये हॉस्टेलला राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य रंजक पद्धतीने दाखवण्यात आले होते. टिव्हीएफ या डिजीटल कंपनीमधील कलाकारांनी मिळून या सीरिजची निर्मिती केली आहे. या सीरिजचे (Hostel Daze) आतपर्यंत दोन सिझन आले आहेत. या दोन सिझनला मिळालेला प्रतिसाद बघता निर्माते सीरिजचा तिसरा सीझन घेऊन येत आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर लॉन्च (Trailer launch) करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या सिरीजमध्ये अहसास चन्ना (Ahsas Channa), लव विसपुते (Luv Vispute), शुभम गौर (Shubham Gaur), निखिल विजय (Nikhil Vijay), आयुषी गुप्ता (Ayushi Gupta) आणि आदर्श गौरव (Aadarsh Gaurav) या अभिनेत्यांनी काम केले आहे. आताच्या सीझनमध्ये पात्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन सीझन्समध्ये ‘अंकित’ हे महत्त्वपूर्ण पात्र आदर्श गौरवने साकारले होते. या ट्रेलरवरुन यंदाच्या सीझनमध्ये ही भूमिका आदर्शच्या ऐवजी उत्सव सरकार (Utsav Sarkar) हा साकारताना दिसणार आहे. तिसऱ्या सीझनमध्ये या व्यतिरिक्तही बरेचसे बदल करण्यात आले आहेत.

 

 

या सीरिजची (Hostel Daze) खासियत अशी की, याच्या प्रत्येक भागामध्ये एक अनुभवी कलाकार शिक्षक, सिनिअर किंवा वॉर्डन अशा सहाय्यक व्यक्तिरेखा साकारताना दिसतो.
अशीच एक भूमिका दिवंगत अभिनेते, कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Comedian Raju Srivastava) यांनी साकारली आहे.
या सीरिजच्या माध्यमातून ते शेवटचे ऑनस्क्रीन काम करताना दिसणार आहेत.
त्याच्या आजूबाजूला हॉस्टेल किंवा कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या चहाच्या टपरीचा सेटअप दिसत आहे.
21 सप्टेंबर रोजी राजू श्रीवास्तव यांचे नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये (AIIMS Hospital) निधन झाले होते.
हि सिरीज मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालणार हे वेब सीरिजच्या ट्रेलरवरून दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Hostel Daze | hostel daze trailer raju srivastava makes his last appearance

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | “काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या… “; अजित पवारांचे स्पष्टीकरण

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण

Pune Crime | पतीनेच दीराबरोबर संबंध ठेवायला सांगितले; नकार दिल्याने विवाहितेला केली मारहाण, हडपसर परिसरातील घटना

 

Related Posts