IMPIMP

Ameya Khopkar On Amol Mitkari | मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा का नाही करत म्हणणाऱ्या मिटकरींची खोपकरांनी काढली अक्कल; म्हणाले…

by nagesh
Ameya Khopkar On Amol Mitkari | amol mitkari ameya khopkar removes ncp mla amol mitkaris intellect

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ameya Khopkar On Amol Mitkari | राज्यभर आज तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. मात्र यावरूनही राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना तिथीनुसार म्हणजेच आज 22 मार्चला शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. मनसेने (MNS) दादरमध्ये (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाला अभिवादन करत शिवजयंती (Shiva Jayanti) साजरी करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसेवर टीका केली होती. या टीकेला मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच नाहीतर रोज साजरी व्हावी मात्र जी काही साजरी केली जात आहे ती मतांसाठी साजरी केली जात आहे. तुमचा वाढदिवस तुम्ही तिथीनुसार साजरा करता का ?, मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा करता का ?, महात्मा फुले यांनीसुद्धा शिवजयंती 19 फेब्रुवारीलाच साजरी केली. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असावी हे शासनमान्य झालं आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. यावरून अमेय खोपकर यांनी मिटकरींवर निशाणा साधला आहे.

 

शिवजयंती आमच्यासाठी सण उत्सव असून दिवाळी (Diwali), गणपती (Ganpati Festival) या हिंदू सणांप्रमाणे (Hindu Festivals) असल्याचं म्हणत अमेय खोपकर यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे.
मिटकरी फालतू राजकारण करू नका, प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करता. अक्कल आहे का तुम्हाला, दरवेळेस तुमचं हेच असतं.
माझा वाढदिवस काही सण नाही, असं खोपकर (Ameya Khopkar) म्हणाले.

 

दरम्यान, अमेय खोपकरांनी (Ameya Khopkar) दिलेल्या प्रत्युत्तरानंतर मिटकरी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Ameya Khopkar On Amol Mitkari | amol mitkari ameya khopkar removes ncp mla amol mitkaris intellect

 

हे देखील वाचा :

Diabetes Symptoms | त्वचेवर दिसणार्‍या ‘या’ 6 लक्षणांवरून जाणून घ्या, तुम्ही डायबिटीजला तर बळी पडणार नाही ना?

How To Get Pink Lips Naturally | गुलाबी आणि चमकदार ओठांसाठी करा ‘हे’ प्रभावी 5 नैसर्गिक उपाय; जाणून घ्या

Multibagger Stocks | 4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, केवळ 52 दिवसांत दिला 1000 टक्के परतावा; 1 लाखाचे झाले 11 लाख

 

Related Posts