IMPIMP

Diabetes Symptoms | त्वचेवर दिसणार्‍या ‘या’ 6 लक्षणांवरून जाणून घ्या, तुम्ही डायबिटीजला तर बळी पडणार नाही ना?

by nagesh
Diabetes Symptoms | diabetes warning signs that appear on your skinknow 6 early symptoms

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Symptoms | मधुमेह (Diabetes) हा एक जुनाट आजार आहे जो खराब आहार (Bad Diet) आणि खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) होतो. या आजारामुळे रुग्णाची ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) झपाट्याने वाढू लागते. हा रोग मेटाबॉलिज्म डिसऑर्डर (Metabolism Disorder) आहे. या आजारामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देऊ शकत नाहीत. मधुमेहाच्या रुग्णामध्ये जेव्हा इन्सुलिन (Insulin) योग्य प्रमाणात तयार होत नाही, तेव्हा त्याचा परिणाम रुग्णाच्या मेटाबॉलिज्मवर (Diabetes Symptoms) होतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मधुमेह हा एक असा आजार आहे ज्याची आधी आपल्या शरीरात लक्षणे दिसू लागतात. शरीरासोबतच आपली त्वचा देखील या आजाराने ग्रस्त होण्याचे संकेत देते. त्वचेमध्ये असे काही बदल होतात जे सांगतात की तुम्ही मधुमेहाच्या विळख्यात सापडत आहात (Diabetes Symptoms).

 

प्री डायबिटीजचे संकेत त्वचा देऊ लागते. तुम्हाला मधुमेहाचा धोका आहे हे त्वचा सांगते.

1. स्कीनमध्ये इन्फेक्शन होणे (Skin Infections) :
प्री-डायबिटीजचे (Pre-diabetes) सर्वात मोठे लक्षण म्हणजे त्वचेला झपाट्याने संसर्ग होणे. त्वचेचा संसर्ग झाला की त्वचा गरम आणि सुजलेली दिसते तसेच त्वचेत वेदना होतात. कधीकधी त्वचा जास्त कोरडी दिसते.

 

2. पायाची बोटे आणि नखांना इन्फेक्शन (Toe And Nail Infection) :
जसजसा मधुमेह वाढत जातो तसतसे पायाची बोटे आणि नखांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. बोटांमध्ये जखमा होऊ शकतात.

 

3. त्वचेवर चट्टे, पुरळ (Scars, Acne On Skin) :
त्वचेवर चट्टे येणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. मधुमेह होण्यापूर्वी, सेल्युलाईट त्वचेवर पडू लागतात आणि हळूहळू त्वचेवर गडद रॅशेस दिसू लागतात. हे चट्टे हात, पाय, पाठीवर कुठेही येऊ शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. त्वचेवर जखम होणे (Skin Lesions) :
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की त्वचेवर जखमा दिसू लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरात कॅन्सर (Cancer) होण्याचा धोका असतो. साखरेमुळे अनेक नसांचे नुकसान होते.

 

5. त्वचा घट्ट होणे (Skin Tightening) :
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा घट्ट होते, काहीवेळा त्वचा जाड दिसते, विशेषतः चेहरा (Face), खांदे (Shoulders) आणि छातीच्या (Chest) त्वचेवर अधिक घट्टपणा दिसून येतो. अनेक प्रकरणांमध्ये, गुडघे (Knees), घोटे (Ankles) आणि कोपरांपासूनही (Elbows) त्वचा घट्ट दिसते.

 

6. त्वचा काळी पडणे आणि लाल चट्टे येणे (Darkening Of Skin And Skin Redness) :
ब्लड शुगर लेव्हल वाढली की त्वचेचा रंगही झपाट्याने बदलतो. साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचेवर गडद रंगाचे ठिपके तयार होऊ लागतात.
या खुणा मानेच्या मागच्या बाजूला आणि पायात असू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये, त्वचेवर लाल ठिपके देखील दिसतात.
हे पुरळ पिंपल्ससारखे दिसतात आणि हळूहळू त्यांचा आकार वाढू लागतो.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Diabetes Symptoms | diabetes warning signs that appear on your skinknow 6 early symptoms

 

हे देखील वाचा :

How To Get Pink Lips Naturally | गुलाबी आणि चमकदार ओठांसाठी करा ‘हे’ प्रभावी 5 नैसर्गिक उपाय; जाणून घ्या

Multibagger Stocks | 4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, केवळ 52 दिवसांत दिला 1000 टक्के परतावा; 1 लाखाचे झाले 11 लाख

How To Get Rid Of Blackheads | सहजपणे मिळवू शकता ‘ब्लॅकहेड्स’पासून मुक्ती, केवळ करा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

 

Related Posts