IMPIMP

Amol Mitkari | ‘नागपूरच्या आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचे पाणी’ – अमोल मिटकरी

by nagesh
Amol Mitkari | maharashtra assembly winter session ncp amol mitkari tweeting video of using toilet water to wash cups in nagpur mla residence

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – नागपूरच्या आमदार निवासात चहाच्या कप बशा धुण्यासाठी सेवक शौचालयाचे पाणी वापरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ ट्वीट करत हा प्रकार सर्वांसमोर आणला आहे. हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर देखील आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमोल मिटकरी ट्वीटरवर लिहितात,

‘हजारो कोटींचे टेंडर कंत्राटदाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्राटदारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.’ आजादी का अमृतमहोत्सव..

 

 

मागील दोन वर्षे कोरोनाच्या महासाथीमुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही. कोरोनाचे सावट दूर झाल्यावर आता प्रथमच हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडत आहे. त्यानिमित्त आमदार निवास आणि विधानभवन यांच्या देखभाल, दुरुस्ती, सुविधा आणि इतर तत्सम कामांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यावर शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले होते. तरी देखील वापराचे पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही.
आमदार निवासातील सेवक कप बशा धुण्यासाठी चक्क शौचालयातील पाणी वापरत असल्याचे उघड झाले आहे.

 

या प्रकारावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संताप व्यक्त केला आहे.
हिवाळी अधिवेशनात आधीच सत्ताधारी आणि विरोधक यांचा कलगी-तुरा रंगला आहे.
त्यात हा नवीन प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून आता अधिवेशनात याचे पडसाद उमटणार यात शंका नाही.
अधिवेशनात नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amol Mitkari | maharashtra assembly winter session ncp amol mitkari tweeting video of using toilet water to wash cups in nagpur mla residence

 

हे देखील वाचा :

Veena Jagtap | वीणाला आली शिव ठाकरेची आठवण; काश्मिरमधील फोटो शेअर करत लिहीले…

Urfi Javed | उर्फीला मुंबई पोलिसांनंतर दुबई पोलिसांचा दणका ! ‘या’ प्रकरणी केली अटक

Aaditya Thackeray | राहुल शेवाळेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य…’

 

Related Posts