IMPIMP

Aaditya Thackeray | राहुल शेवाळेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य…’

by nagesh
Budget 2023 | aaditya thackeray reaction on fm nirmala sitharaman union budget 2023

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput Case) शिंदे गटाचे (Shinde Group)
खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) ‘एयू’ नावाने 44 वेळा फोन कॉल आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य ठाकरे
(Aaditya Thackeray) असा होतो, असा आरोप शेवाळे यांनी केला. लोकसभेत प्रश्न उपस्थित करत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. राहुल
शेवाळेंच्या आरोपाला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, त्या घाणीत मला जायचं नाही. ज्यांची निष्टा ज्यांच्या घरात नसते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? बंडखोरी केलेल्यांना त्यांचेच मित्रपक्ष अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एनआयटी भूखंड प्रकरणात (NIT Plot Case) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अडचणीत येत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी असे घाणेरडे मुद्दे पुढे केले जात आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

 

महापुरुषांचे अपमान, एनआयटी भूखंड घोटाळा आणि सीमावादासह अनेक प्रश्नांवर सभागृहात प्रश्न उपस्थित केले.
परंतु, आम्हाला बोलू दिलं जात नाही. राज्यातील खेरे प्रश्न बाजूला करुन अशा प्रश्नांवरुन बदनामी करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला जातोय.
राज्यातील प्रश्नांवर बोलालयला गेलं की माईक बंद केले जातात.
राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करत असताना त्यांना पदमुक्त करण्यापेक्षा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

 

राज्यपालांविरोधात आज आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आमच्या विरोधात घोषणा देत आम्हाला बोलू दिले नाही.
त्यामुळे हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचं लक्षात येतं.
एनआयटी घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
कोर्टाने देखील त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
त्यामुळेच या प्रकरणातून त्यांना वाचवण्यासाठी घाणेरडे मुद्दे पुढे करुन बदनामी केली जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Aaditya Thackeray | aditya thackeray has responded to shinde group mp rahul shewale allegations in sushant singh rajput case

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | सोशल मिडीया वापरावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खडे बोल; म्हणाले…

Central Railway | मध्य रेल्वेत पदोन्नती आरक्षण लागू करण्याची मागणी, अन्यथा ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असोसिएशनचा मोर्चा काढण्याचा इशारा

Ajit Pawar | ‘कोरोना’च्या संकटाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

 

Related Posts