IMPIMP

Veena Jagtap | वीणाला आली शिव ठाकरेची आठवण; काश्मिरमधील फोटो शेअर करत लिहीले…

by nagesh
Veena Jagtap | veena jagtap missing shiv thakare share instagram post said when love

सरकारसत्ता ऑनलाईन  – बिग बॉस मराठी हा शो चांगलाच गाजला आहे. बिग बॉस मराठीतून घराघरात पोहचलेले जोडपे म्हणजे अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप (Veena Jagtap). या दोघांची लव्ह स्टोरी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांसमोर आली. ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. तसेच या दोघांच्या ऑन स्क्रीन केमेस्ट्रीमुळेच दुसऱ्या पर्वाचा विजेता होण्याचा बहुमान शिव ठाकरेला मिळाल्याचे बोलले जात होते. त्यातच आता वीणाने (Veena Jagtap) सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. आणि तिची ती पोस्ट सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वीणा जगताप (Veena Jagtap) ही सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या इंन्स्टाग्रामवरून नेहमी पोस्ट करत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती चाहत्यांना देत असते. त्यातच आता वीणाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. आणि तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. तिने या पोस्टमध्ये तिच्या काश्मिर ट्रीपचा फोटो शेअर केला आहे. त्यात ती दल सरोवरातील बोटींगचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोला वीणाने (Veena Jagtap) छान कॅप्शन दिले असून तिच्या या कॅप्शनवरून ती अभिनेता शिव ठाकरेच्या आठवणींमध्ये बुडाल्याचे कमेंटच्या माध्यमातून त्या दोघांचे चाहते बोलताना दिसत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तिने तिच्या इंन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ‘न उम्र की सीमा हो, न जनम का हो बंधन,
जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन’ तिच्या या पोस्टचा संदर्भ शिव ठाकरेसोबत लावत या दोघांच्या
चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने लिहीले आहे की, ‘ताई तु आणि शिवदादा एकत्र या’.
‘तर दुसऱ्याने शिव आणि वीणा (Veena Jagtap) ही परफेक्ट जोडी आहे अशी कमेंट केली आहे.
तसेच बऱ्याच चाहत्यांनी शिव ठाकरेचे नाव लिहीत हार्ट ईमोजी कमेंटमध्ये टाकला आहे.

 

 

Web Title :- Veena Jagtap | veena jagtap missing shiv thakare share instagram post said when love

 

हे देखील वाचा :

Urfi Javed | उर्फीला मुंबई पोलिसांनंतर दुबई पोलिसांचा दणका ! ‘या’ प्रकरणी केली अटक

Aaditya Thackeray | राहुल शेवाळेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी आणि मुख्य…’

Raj Thackeray | सोशल मिडीया वापरावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खडे बोल; म्हणाले…

Central Railway | मध्य रेल्वेत पदोन्नती आरक्षण लागू करण्याची मागणी, अन्यथा ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असोसिएशनचा मोर्चा काढण्याचा इशारा

 

Related Posts