IMPIMP

Amravati Love Jihad Case | काल पोलिसांना जबाब, आज तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप, माझी बदनामी थांबवा… लव्ह जिहाद बनावट!

by nagesh
Amravati Love Jihad Case | amravati mp navneet rana defamed me love jihad allegation case girl statement to police

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी आरोप केलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाला (Amravati Love Jihad Case) आता वेगळं वळण मिळालं आहे. ज्या प्रकरणावरुन नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात राडा केला, गोंधळ घालत पोलिसांशी हुज्जत घातली. त्याच लव्ह जिहाद प्रकरणातल्या मुलीने नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली, असा गंभीर आरोप (Serious Allegation) केला आहे. दरम्यान काल पोलिसांना दिलेल्या जबाबात मुलीने लव्ह जिहाद (Amravati Love Jihad Case) वगैरे असा काही प्रकार नसल्याचे सांगत माझ्या वैयक्तिक कारणांनी मी घर सोडून केले होते, अस सांगत राणांना तोंडघशी पाडले. तर आज राणांवर बदनामीचा आरोप करुन त्यांना आणखीनच अडचणीत आणले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विशिष्ट धर्मातील युवकाने मुलीचे अपहरण (Kidnapping) केल्याचा आरोप प्रकरणातील बेपत्ता मुलीला बुधवारी रात्री उशिरा सातारा पोलिसांनी (Satara Police) ताब्यात घेतले. अमरावती पोलिसांनी सातारा पोलीस आणि पुणे जीआरपी (Pune GRP) पोलिसांना सूचना दिल्यावर प्रवास करत असलेल्या ट्रेनमधून मुलीला ताब्यात घेतले. अपहरण झाल्याच्या आरोपानंतर शहरात वाद निर्माण झाला होता. बुधवारी दिवसभर यावरुन वातावरण तापले असताना नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) 20 मिनिटे गोंधळ घातला. मात्र तरुणीने पोलिसांना दिलेल्या रोखठोक जबाबाने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं.

 

अमरावतीचं प्रकरण हे लव्ह जिहादचं (Amravati Love Jihad Case) असल्याचं भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी
(BJP Spokesperson Shivarai Kulkarni) आणि खासदार नवनीत राणा यांनी ठासून सांगितलं.
मात्र पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिचा साताऱ्यात आणि अमरावतीत जबाब नोंदवला.
यावेळी मुलीने माझ्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले.
मी माझ्या काही वैयक्तिक कारणांनी गेली होती. मला कोणीही पळवून नेलं नव्हतं.
माझी बदनामी थाबवा, असं सांगत खासदार राणा यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे.

 

 

Web Title :- Amravati Love Jihad Case | amravati mp navneet rana defamed me love jihad allegation case girl statement to police

हे देखील वाचा :

German Shepherd Attack Zomato Delivery Boy | लिफ्टमध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टवर कुत्र्याने घेतला चावा, नोएडा-गाझियाबादनंतर मुंबईतील व्हिडिओ व्हायरल

Diabetes | जेवणानंतर केवळ 5 मिनिटे करा हे काम, नियंत्रणात राहील डायबिटीज

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उध्दव ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘फोटो काढायला लोकांच्या जवळ यायला लागतं’

 

Related Posts