IMPIMP

Amruta Fadnavis In Pune | वेश्या व्यवसायाला पण एक डिगनीटी मिळायला पाहिजे ! पुण्यात अमृता फडणवीसांच्या हस्ते वेश्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचं उद्घाटन (व्हिडीओ)

by nagesh
 Amruta Fadnavis | amruta fadnavis files fir against designer Aniksha alleges threat conspiracy and offering rs 1 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Amruta Fadnavis In Pune | पुण्यातील (Pune News) भाजप महिला आघाडीकडून लाल बत्ती भागातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis In Pune) बोलत होत्या. ‘वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा. जर्मनीमध्ये तर त्याकडे आदराने बघितले जाते. मी त्याच्या पाठीमागे आहे,’ असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “समाजात वेश्याव्यवसायामुळे संतुलन राखलं जातेय. वेश्या व्यवसाय हा पुरातन काळापासून आहे. समाजाचं संतुलन राखण्याचं काम करताना तुम्हाला गर्व वाटायला पाहिजे. तुम्ही जे काम करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहेत. पैशासाठी आणि गरिबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आल्या असाल तरीही गर्वाचं काम करत आहात, ” असं म्हणत त्यांना अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis In Pune) आधार दिला.

 

 

पुढे त्या म्हणाल्या, “तुमच्या या व्यवसायाला सुप्रीम कोर्टाचाही (Supreme Court) पाठिंबा आहे.
तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही सगळे आहोत.
तुम्ही कोणत्याही कारणामुळे या व्यवसायात पडल्या असाल तरीही तुम्ही सगळ्या या समाजाचा अविभाज्य भाग आहात.
जर तुमच्यावर काही वाईट प्रसंग आला तर तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत.”

 

दरम्यान, आपल्या मुलींना काय करायचं आहे. हे लक्षात घ्या. त्यांना सुरुवात देणं ही तुमची जबाबदारी आहे.
त्यांच्या शिक्षणाची सोय करणेही महत्वाचं आहे आणि स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं देखील तेवढंच महत्वाचं आहे.
या व्यवसायामुळे अनेक रोगांची बाधा होऊ शकते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करु नका.
चांगल्या ट्रेनरची नेमणुक करुन तुमच्यासाठी योगा सेशन ठेवेन, असं त्या म्हणाल्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Amruta Fadnavis In Pune | But the prostitution business should get a dignity Amruta Fadnavis inaugurates free health camp for prostitutes in Pune (video)

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | खळबळजनक ! हिंजवडी परिसरात दारु पिल्याचा जाब विचारल्याच्या रागातून इंजिनिअर पत्नीचा खून, इंजिनिअर पतीचं कृत्य

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरूणाचं कृत्य

Chandrakant Patil | ‘देवेंद्र फडणवीस हे वेगळंच रसायन; त्यांच्या डोक्यात…’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts