IMPIMP

Amruta Fadnavis | ‘जाहीर माफी मागून ते ट्विट 48 तासांत डिलिट करा, अन्यथा…’, अमृता फडणवीस यांचा मलिकांना इशारा

by nagesh
Amruta Fadnavis | mumbai drugs case amrita fadnavis warns ncp minister nawab malik send notice defamation including criminal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन नवाब मलिक (Nawab Malik) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राजकीय युद्ध आता कोर्टाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचलं आहे. सकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक (Nilofer Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अब्रुनुकसानीसंदर्भात नोटीस धाडली आहे. तर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांनी नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत मानहानीची नोटीस (Defamation notice) पाठवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी निलोफर मिलिक यांनी केली आहे. तर नवाब मलिक यांनी 48 तासांत आक्षेपार्ह ट्विट मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या, नवाब मलिक यांनी काही फोटो शेअर करुन आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता.
त्या विरोधात मी आता आयपीसीच्या (IPC) विविध कलमांखाली तक्रारीसह अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात येत आहे.
नवाब मलिक यांनी एकतर बिनशर्त जाहीर माफी मागावी व ते ट्विट 48 तासात डिलिट करावे.
अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

दरम्यान, मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीसांनी मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला.
तसेच जावयाच्या घरात अमली पदार्थ (Drugs) सापडल्याचा दावा केला होता.
यानंतर मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस (Legal notice) पाठवली आहे.
तसेच लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा (defamation) खटला दाखल करण्याचा इशारा निलोफर मलिक यांनी दिला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यासंदर्भात निलोफर मलिक यांनी ट्विट करुन माहीती दिली. त्यांनी म्हटले की, खोटे आरोप एखाद्याचे जीवन उद्धवस्त करु शकतात.
त्यामुळे असे आरोप करण्यापूर्वी आपण काय आरोप करत आहोत, हे जाणून घेतले पाहिजेत.
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या कुटुंबाबत खोटे दावे (claims) आणि विधानं (statement) केली होती.
त्याबाबत ही मानहानीची नोटीस देण्यात येत आहे. आता या प्रकरणात आम्ही मागे हटणार नाही, असेही निलोफर यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title : Amruta Fadnavis | mumbai drugs case amrita fadnavis warns ncp minister nawab malik send notice defamation including criminal

 

हे देखील वाचा :

Yavatmal Crime | सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरचा खून, कॉलेजमध्ये प्रचंड खळबळ

Beed Crime | फोटो काढण्याचा नाद बेतला जीवावर; 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव किंचीत वधारले; जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts