IMPIMP

Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा

by nagesh
Amruta Fadnavis | naughty comment by amruta fadnavis sharing photos of rangpachami

सरकारसत्ता ऑनलाइन – Amruta Fadnavis | गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने सणांवर निर्बंध होते. मात्र यावर्षी पुन्हा तोच जोश सण साजरा करताना पाहायला मिळाला. मोठ्या उत्साहात धुळवडीचा सण राज्यभर साजरा करण्यात आला. होळी आणि धुळवडीचा सण साजरा करताना नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होताच पण नेतेमंडळीही यामध्ये मागे नव्हती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही धुलीवंदन साजरे केल्याचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधत एक ‘नॉटी’ कमेंटही केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नॉटी कमेंट करून पहिल्यांदाच अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला नाही तर यापूर्वीही त्यांनी राऊत यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी होळी, रंगपंचमीनिमित्त सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्याचं पण यावेळी त्यांनी शिवसेनेला चिमटा ही काढला.

 

 

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. संजय राऊत यांनी कंगणाबद्दल अर्वाच्च शब्दाचा वापर केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका होत होती. राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून कंगना थोडी नॉटी आहे. ती साधारणपणे असेच बोलत असते. तिची वक्तव्ये मी पाहिली असून मला माझ्या भाषेत तिला बेईमान म्हणायचे होते. असे म्हणण्यासाठी आम्ही हरामखोर शब्दाचा वापर करतो असं त्यांनी सांगितलं होतं

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांच्या या विधानावरून त्यांना नॉटी शब्दावरुन लक्ष्य केलं होतं. अमृता फडणवीस यांनी नॉटी ट्विट महाविकास आघाडीला डिवचले होते. थोडक्यात उत्तर द्या, ५० मार्क्स; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले….. या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स ! __शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब __है और सुनने में आया है ___नामर्द है !” असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

 

आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी होळी आणि रंगपंचमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना अमृता यांनी नॉटी शब्दाचा वापर केला आहे. सर्व प्रियजनांना आणि नॉटी जनांनाही होळी, रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा… असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विट वरून अमृता यांनी संजय राऊत यांच्यावरच निशाणा साधल्याचे दिसत आहे.

 

Web Title :- Amruta Fadnavis | naughty comment by amruta fadnavis sharing photos of rangpachami

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना

Pune Crime | धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलीवर वडिल, भाऊ आणि आजोबा, चुलत मामाने केले लैंगिक अत्याचार; समुपदेशक महिला ‘गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच’ शिकवताना पिडीतीने सांगितली ‘आपबिती’

Kolhapur North By Election | चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘सतेज पाटील प्रस्ताव घेऊन आले होते, पण…’ (व्हिडिओ)

 

Related Posts