IMPIMP

Kolhapur North By Election | चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘सतेज पाटील प्रस्ताव घेऊन आले होते, पण…’ (व्हिडिओ)

by nagesh
Chandrakant Patil On Kolhapur North By Election | BJP leader chandrakant patil criticized on congress leader and maharashtra minister satej patil kolhapur by election final result

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइनकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Kolhapur North By Election) जाहीर झाली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीबाबत (Kolhapur North By Election) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी सांगितले की, विधान परिषदेप्रमाणे (Legislative Council) ‘उत्तर’ची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव घेऊन मुंबईत पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil) भेटले. मात्र, विधान परिषदेच्यावेळी आम्हाला तीन जागा बिनविरोध करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही तयार झालो. परंतु आता तशी परिस्थिती नसल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप ही निवडणूक लढवणार असल्याचे मी स्पष्ट सांगितल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चंद्रकांत पाटील कोल्हापुरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना भाजप उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, आम्ही सत्यजित कदम (Satyajit Kadam) आणि महेश जाधव (Mahesh Jadhav) या दोघांची नावे दिल्लीला पाठवली आहेत. त्यातील आमचे पसंतीचे नाव म्हणून सत्यजित कदम यांच्या नावाची आम्ही शिफारस केली आहे. मात्र, अधिकृत घोषणा दिल्लीतूनच होणार आहे. उशीर झाला तरी उद्या सकाळपर्यंत निर्णय होईल असेही पाटील यांनी सांगितले.

 

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ही निवडणूक त्याचवेळी बिनविरोध होईल,
ज्यावेळी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) या भाजपच्या चिन्हावर लढतील आणि दोन्ही काँग्रेस पाठिंबा देतील. सतेज पाटील हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांना भेटणार असल्याचे सांगितल्यावर पाटील म्हणाले,
या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे.
राज्यपातळीवर एकदा देवेंद्र फडणवीस आणि मी ठरविल्यानंतर त्यात बदल होत नाही,
असेही त्यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उत्तरची निवडणूक तुम्ही कोणत्या विषयावर लढवणार असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, खूप विषय आहेत. अनेक वर्षे डोक्यावर बसलेला
तो टोल आम्ही घालवला आहे.
तीर्थक्षेत्रासाठी कोट्यावधी रुपयांचा आराखडा करुन निधी देण्यास सुरुवात केली.
मात्र महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) तो पुढे देता आला नाही.
महापालिकेत (Municipal Corporation) यांनी पाच वर्षात दाखवण्याजोगं काहीच काम केलेलं नाही.
भूखंडाच्या भ्रष्टाचाराचा (Corruption) मुद्दाही प्रचारात येणार आहे.
राजू शेट्टी (Raju Shetty) भाजपसोबत येणार असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Kolhapur North By Election | Kolhapur guardian minister satej patil met chandrakant patil regarding holding of kolhapur north by election without any objection

 

हे देखील वाचा :

EPFO | प्रॉव्हिडेंट फंडात रू. 2.50 लाखोपक्षा जास्तीच्या योगदानावर आता लागणार टॅक्स, जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

Gular Benefits | पोटदुखीवर उंबराचे सेवन फायदेशीर, अशक्तपणा दूर होतो

Kolhapur North By Election | अखेर कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

 

Related Posts