IMPIMP

Anil Deshmukh-Anil Parab | पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यात गुप्त बैठका?

by nagesh
Anil Deshmukh-Anil Parab | Top secret meetings was happened between deshmukh and parab for maharashtra police officer transfers

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh-Anil Parab | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मागील काही दिवसांपासून अनिल देशमुखांची ईडीकडून (ED) चौकशी सुरू आहे. मागच्या चौकशीदरम्यान देशमुखांनी पोलीस बदल्यांच्या रॅकेट (Police Officer Transfer Racket) प्रकरणात काही आरोप थेट शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर केले आहेत. त्यानंतर ओएसडी रवी व्हटकर (Ravi Vhatkar) जबाब नोंदवताना अनिल परब यांच्यावरच आरोप करत खुलासा केला आहे. (Anil Deshmukh-Anil Parab)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘पोलीसांच्या बदल्यांसाठी अनिल परब हे अनिल देशमुखांना भेटायचे,’ असा खुलासा रवी व्हटकर यांनी केला आहे.
जबाबात रवी व्हटकर म्हणाले की, ”पोलीस आस्थापन मंडळ हे फक्त नावापुरतं असून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय हा आधीच घेतला जायचा.
ED च्या आरोपपत्रात याची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीपूर्वी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यात गुप्त बैठक व्हायची. या बैठकीत काॅग्रेस नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेकडून अनिल परब नाव पाठवायचे. ही यादी मी ज्ञानेश्वरी व सह्याद्री अतिथीगृह अथवा मंत्रालयात दिल्याचे,” त्यांनी सांगितलं. (Anil Deshmukh-Anil Parab)

 

”ही बैठक अत्यंत गुप्त आणि खाजगी होती, त्यामुळेच या बैठकींचे कोणतेही रेकॉर्ड किंवा इतिवृत्त तयार करण्यात आले,” नसल्याचंही व्हटकर यांनी सांगितलं.
पुढे रवी व्हटकर यांनी ईडीच्या आरोपपत्रात सांगितले की, ”मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त (CP) असतात.
या समितीत PSI ते DCP दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो.
मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार केलीय.
ही यादी स्वत: अनिल देशमुख यांनी अनेकवेळा दिली होती.
त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे (Sanjeev Palande) अथवा ओएसडी रवी व्हटकर (OSD Ravi Vhatkar) यांनीही अनेकदा दिली होती.
बदल्यांची यादी अनिल परब यांच्याकडून दिली जात होती,” असं ते म्हणाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Anil Deshmukh-Anil Parab | Top secret meetings was happened between deshmukh and parab for maharashtra police officer transfers

 

हे देखील वाचा :

IPL 2022 | आयपीएलच्या मॅचेस मुंबई-पुण्यात होणार का? सौरव गांगुली म्हणाला…

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी 3 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Dr. Sumit Saha | समाजामध्ये कर्करोगाची जागरूकता होणे काळाजी गरज – डॉ. सुमित शहा

 

Related Posts