IMPIMP

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना जामीन, मात्र CBI च्या भूमिकेमुळे 10 दिवसांची स्थगिती

by nagesh
Anil Deshmukh | Former Home Minister Of Maharashtra And NCP Leader Anil Deshmukh Bail Stay For 10 Days CBI Will Appeal To SC

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर (Bail Granted) झाला आहे. देशमुख यांच्यावर जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital) उपचार सुरु आहेत. एम.एस. कर्णिक (Justice MS Karnik) यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख यांच्यावर खोटे आरोप केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उच्च न्यायालयाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणामध्ये कोणताही पुरावा नसताना आरोप केला आहे. या प्रकरणात 2021 मध्ये गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये बेकायदेशीरपणे त्यांना अटक (Arrest) करण्यात आली. परमबीर सिंग (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद आम्ही न्यायालयासमोर केल्याची माहिती देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी (Adv. Vikram Chaudhary) यांनी पत्रकारांना दिली.

 

 

उच्च न्यायालयाने (High Court) जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने (CBI) या जामिनाविरोधात
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाणार असल्याचे न्यायालयाला सांगितले.
यासाठी 10 दिवसांची स्थगिती (Adjournment) या निर्णयावर द्यावी अशी मागणी सीबीआयने केली.
न्यायालयाने हे म्हणणे ऐकून घेत या निर्णयाला दहा दिवसांची स्थगिती दिली असल्याने देशमुख यांना
जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना तुरुंगातून मुक्त केले जाणार नाही. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी
याबाबत माहिती दिली. तसेच उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातही कायम राहील असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anil Deshmukh | Former Home Minister Of Maharashtra And NCP Leader Anil Deshmukh Bail Stay For 10 Days CBI Will Appeal To SC

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | ‘शाईफेक करणार्‍यावर 307 चा गुन्हा योग्य नाही’ – जितेंद्र आव्हाड

Pankaja Munde | छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्यावरून पंकजा मुंडे गोपिनाथ गडावर अर्धातास मौन पाळणार

BJP Leader Chandrakant Patil | “…म्हणजे गोळवलकर आणि हेडगेवारांनी खोक्यांनी पैसे घेतले”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची उपरोधात्मक टीका

 

Related Posts