IMPIMP

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांना दणका ! हाय कोर्टानं समन्स रद्द करण्यास दिला नकार, केली ‘ही’ सूचना

by nagesh
Anil Deshmukh | chargesheet filed by cbi against anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पैशांच्या गैरव्यहारप्रकरणी ईडीकडून (ED) मागील अनेक दिवसांपासून नोटीस बजावल्या जात आहेत. त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. मात्र अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजार झालेले नाही. दरम्यान, ईडीने समन्स बाजवल्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या विरोधात उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचीका (petition) दाखल केली होती. परंतु न्यायालयाने देशमुख यांना मोठा दणका दिला आहे. समन्स (summons) रद्द करण्यास नकार देऊन अर्टकपूर्व जामिनासाठी विशेष न्यायालयात जाण्याची सूचना केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

मागील काही महिन्यांपासून अज्ञातवासात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. त्यांचा ठावठिकाणी मिळविण्यासाठी ईडी, सीबीआय (CBI) यांना कळवण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांना पकडण्यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी केली जाण्याची शक्यता आहे.

 

मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीने मागील पाच महिन्यात चौकशीला हजर राहण्यासाठी पाच वेळा समन्स जारी केले होते. परंतु ते एकदाही हजर झाले नाहीत. तसेच सीबीआयने त्यांच्या कार्यालय व घरावर पाचवेळा छापे टाकले. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना दिलासा न मिळाल्याने सीबीआय व ईडीकडून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुख हे अज्ञातवासात आहे. त्यांना शोधण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याने पुन्हा वेगाने हालचाली करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Anil Deshmukh | Mumbai high court trejected quash summoned issued ed former home minister anil deshmukh

 

हे देखील वाचा :

Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Anti Corruption Bureau Nanded | दोन वेळा वाचला पण तिसऱ्यांदा ‘लाचखोर’ तलाठी 10 हजार घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’

 

Related Posts