IMPIMP

Anil Parab | ‘किरीट सोमय्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नाही; ज्यावेळी जेलमध्ये जायची वेळ येईल तेव्हा…’

by nagesh
Kirit Somaiya-Sai Resort | bjp leader kiriti somaiya sai resort officials reveal the wrong information given by kirit somaiya in the sai resort case

 पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेना नेते (Shivsena Leader) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीने (ED) 27 मे रोजी छापेमारी केली. ईडीने पुणे (Pune), मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरी (Ratnagiri) अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. अनिल परब (Anil Parab) यांना दापोली (Dapoli) मधील जमीन विकणाऱ्या विभास साठेच्या (Vibhas Sathe) कोथरुडमधील घरावर देखील छापा (ED Raid) टाकला होता. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी विभास साठेचा मनसुख हिरेन (Mansukh Hiren) होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली. याबाबत अनिल परब यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अनिल परब (Anil Parab) म्हणाले, मी किरीट सोमय्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नाही. सोमय्या म्हणजे कोणतीही तपास यंत्रणा नाही. त्यांना तक्रार करण्याचा अधिकार असून त्या केल्या आहेत. ज्या यंत्रणा मला प्रश्न विचारतील त्यांना उत्तर देण्यास मी बांधील आहे. त्यांनी यापुढेही प्रश्न विचारले तर मी उत्तर देईन.

 

विभास साठेंकडून खरेदी केलेल्या जमीन व्यवहराबाबत बोलताना परब म्हणाले, विभास साठे यांच्याकडून जमीन खरेदी (Land Purchase) केली आणि नंतर विकली. माझा व्यवहार पारदर्शक आहे. ज्यांनी रिसॉर्ट बांधलं त्यांनी त्याची जबाबदारी घेतली आहे. सर्व कागदपत्रे तपास यंत्रणांना दिली आहेत. यापूर्वीही ईडीची चौकशी (Inquiry) झाली. पुन्हा एकदा शिळ्या कढीला उत आणून बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही किरीट सोमय्यांना उत्तर देणार नसल्याचे सांगत यंत्रणा चौकशी करेल आणि त्यातून सत्य बाहेर येईल, असे परब म्हणाले.

 

ज्यावेळी जेलमध्ये जाण्याची वेळ येईल तेव्हा कुठून कसा जाणार ते सांगतो.
किरीट सोमय्यांना जिथे योग्य वाटेल त्या ठिकाणी तक्रार करावी. याची दखल सरकार घेईल, असेही परब यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anil Parab | shivsena leader and maharashtra minister anil parab reaction to kirit somaiya allegations

 

हे देखील वाचा :

Post Office Franchise | पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी उघडा, दरमहिना कमवा 50 हजार रुपये; जाणून घ्या

तुमच्याकडे असलेले Aadhaar Card बनावट तर नाही ना ? काही क्षणात ‘या’ पध्दतीनं समजू शकतं, जाणून घ्या

Sachin Waze | सचिन वाझेचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज विशेष कोर्टाकडून मंजूर; अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ?

 

Related Posts