IMPIMP

Post Office Franchise | पोस्ट ऑफिसची फ्रेंचायझी उघडा, दरमहिना कमवा 50 हजार रुपये; जाणून घ्या

by nagesh
Post Office Saving Scheme | savings post office savings schemes interest rates sukanya samriddhi yojana ppf kisan vikas patra

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Franchise | पोस्ट ऑफिस केवळ लोकांच्या पत्त्यावर पत्रे पोहोचवण्याचे काम करत नाही तर ते लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. जनतेच्या सुख – दु:खाच्या काळात टपाल खाते त्यांच्यासोबत असते. या सगळ्याशिवाय पोस्ट ऑफिस इतरही अनेक भूमिका बजावते. यामुळे लोकांची बचत सुरक्षित राहते आणि गुंतवणुकीच्या संधीही उपलब्ध होतात. पोस्ट ऑफिस लाखो लोकांना रोजगार देते. (Post Office Franchise)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

होऊ शकते कमाईचे साधन
तुम्ही पोस्ट ऑफिसला तुमचे कमाईचे साधन बनवू शकता आणि यासाठी जास्त भांडवल किंवा पदवी, डिप्लोमाची गरज नाही. केवळ आठवी उत्तीर्ण व्यक्ती पोस्ट ऑफिसला उत्पन्नाचा स्रोत बनवू शकते.

 

फ्रेंचायझी कुठे सुरू करायची
येथे आपण पोस्ट ऑफिस फ्रेंचायझीबद्दल बोलत आहोत. पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी घेऊन तुम्ही दरमहा 50 हजार रुपये कमवू शकता. फ्रेंचायझी घेऊन तुम्ही गावात किंवा शहरात कुठेतरी पोस्ट ऑफिसमध्ये काम करून कमाई सुरू करू शकता. (Post Office Franchise)

 

फ्रेंचायझी आउटलेट
देशभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पोस्ट ऑफिस उघडण्याची गरज आहे, पण तिथे ही सुविधा दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे तेथील लोकांना टपाल सुविधा देण्यासाठी फ्रेंचायझी आऊटलेट उघडण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोण घेऊ शकतात पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी
हे काम कोणताही भारतीय नागरिक करू शकतो. फ्रेंचायझीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. फ्रेंचायझी घेऊ इच्छिणारी व्यक्ती आठवी उत्तीर्ण असावी.

 

कशी होईल कमाई
पोस्ट ऑफिस फ्रेंचायझी घेतल्यानंतर, तुम्ही कमिशनद्वारे कमाई करता. यामध्ये तुम्ही रजिस्टर पत्र, स्पीड पोस्ट बुकिंग, मनी ऑर्डर, रजिस्ट्री, स्टॅम्प, पोस्टल स्टेशनरी आणि मनी ऑर्डर फॉर्म विकून कमाई करू शकता. (How To Start Post Office Franchise)

 

फ्रेंचायझी कशी मिळवायची
पोस्ट ऑफिसमध्ये दोन प्रकारच्या फ्रेंचायझी आहेत. एक आउटलेट फ्रेंचायझी आहे आणि दुसरी पोस्टल एजंट फ्रेंचायझी आहे. तुम्ही या दोन फ्रेंचायझीपैकी एक घेऊ शकता.

 

पोस्टल एजंट फ्रेंचायझी
शहरी आणि ग्रामीण भागात टपाल तिकिटे आणि स्टेशनरी घरोघरी पोहोचवणारे एजंट असतात. त्यास पोस्टल एजंट फ्रेंचायझी म्हणून ओळखले जाते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फ्रेंचायझीसाठी अर्ज करणे आवश्यक
तुम्हाला पोस्ट ऑफिस फ्रेंचायझीसाठी अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी तुम्ही इंडिया पोस्ट वेबसाइटवरील अधिकृत लिंकवर क्लिक करू शकता. येथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि फ्रेंचायझीसाठी अर्ज करू शकता.

 

करारावर करा स्वाक्षरी
अर्ज केल्यानंतर फ्रेंचायझीसाठी निवडलेल्या सर्वांना पोस्ट विभागाशी करार करावा लागेल.
या करारानंतर टपाल खात्यात दिल्या जाणार्‍या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम तुम्ही सुरू करू शकता.

 

Web Title :- Post Office Franchise | start post office franchise earn rs 50000 per month

 

हे देखील वाचा :

तुमच्याकडे असलेले Aadhaar Card बनावट तर नाही ना ? काही क्षणात ‘या’ पध्दतीनं समजू शकतं, जाणून घ्या

Rajesh Tope | ‘Corona वाढत असला तरी काळजी करण्याचे कारण नाही, नागरिकांनी…’ – राजेश टोपे

Sachin Waze | सचिन वाझेचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज विशेष कोर्टाकडून मंजूर; अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ?

 

Related Posts