IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजाराची लाच घेताना महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनम्हाळुंगे येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या (Land) सातबारा (7/12) उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी 30 हजार रुपयाची लाच मागून (Demand Bribe) 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) महिला तलाठी वर्षा मधुकर धामणे Talathi Varsha Madhukar Dhamne (वय – 45) आणि खासगी इसम अकबर यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून अटक (Arrest) केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई खेड तालुक्यातील (Khed Taluka) आंबेठाण तलाठी कार्यालयात (Ambethan Talathi Office) आज (बुधवार) केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली आहे. तर लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या महिला तलाठी वर्षा धामणे यांच्याकडे म्हाळुंगेसह (Mahalunge) आंबेठाणचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार यांनी 2017 मध्ये म्हाळुंगे येथे जमिन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांना नोंदणी करायची होती. सातबाऱ्यावर नोंदणी (Registration) करण्यासाठी खासगी इसम अकबर याने सुरुवातीला एक लाख रुपये लाच मागितली. यानंतर तलाठी वर्षा धामणे यांनी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीत 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली. पथकाने 5,8,10 आणि 11 मार्च रोजी पडताळणी केली. पडताळणीमध्ये तलाठी वर्षा धामणे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज आंबेठाण तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच घेताना तलाठी वर्षा धामणे आणि खासगी इसम अकबर यांना रंगेहाथ पकडले. आरोपींवर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्योती पाटील (Police Inspector Jyoti Patil) करीत आहेत.

 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | ACB Pune Arrest Lady Talathi while taking bribe of 20 thousands

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’ची रुग्णसंख्या घटली, आज एकही मृत्यू नाही; जाणून घ्या इतर आकडेवारी

Diabetes Management | उत्सवाच्या गोडव्याने वाढत नाहीना रक्तालील गोडवा? होळीपर्वात मधुमेही रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली पुणे महानगरपालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांची भेट

 

Related Posts