IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 5 हजाराची लाच घेताना भोर वैद्यकिय अधीक्षक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनसोनोग्राफी सेंटरची (Sonography Center) तपासणी करुन अनियमितता आढळल्यास जिल्हा शल्य चिकित्सक
(District Surgeon) यांच्याकडे प्रतिकुल अहवाल न पाठवण्यासाठी वैद्यकिय अधीक्षक डॉ. अमित हिंदुराव सरदेसाई Dr. Amit Hindurao Sardesai
(वय – 60) यांना 5 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) रंगेहात पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) ही कारवाई (मंगळवार) भोर उप जिल्हा रुग्णालयात (Bhor Sub District Hospital) सापळा रचून केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी 42 वर्षीय डॉक्टरांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent) डॉ. अमित सरदेसाई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सोनोग्राफी सेंटरला प्रत्यक्ष भेट देवून तपासणी करुन त्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठवायचा असतो. तक्रारदार हे व्यावसायाने डॉक्टर असून त्यांचे भोर येथे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर असून या सेंटरची तपासणी करुन अनियमितता आढळल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे प्रतिकुल अहवाल न पाठवण्यासाठी डॉ. अमित सरदेसाई यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितली (Demand Bribe). तडजोडीमध्ये पाच हजार रुपये देण्याचे ठरले.

 

तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यावेळी डॉ. अमित सरदेसाई यांनी पाच हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज उप जिल्हा रुग्णालयात सापळा रचून डॉ. सरदेसाई यांना लाच घेताना रंगेहात पकडले. पुढील तपास लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde) करीत आहेत.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Bhor medical superintendent caught taking bribe of Rs 5000 ACB Pune

 

हे देखील वाचा :

EPFO यांच्या खात्यात पाठवणार आहे 100 कोटी रुपये, बोर्डाच्या बैठकीत ठेवणार प्रस्ताव

Cardamom To Control BP | ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी प्रभावी आहे वेलची, जाणून घ्या फायदे

Pune Crime | पुण्यात राज्यपालाविरुद्ध आंदोलन करणार्‍या ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Sharad Pawar On Devendra Fadnavis | शरद पवारांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला, म्हणाले – ‘125 तासांची रेकॉर्डिंग मिळवणं ही कौतुकास्पद बाब, मात्र…’

 

Related Posts