IMPIMP

Deepak Mankar On PM Modi Sabha in Pune | पुण्यातील मोदींच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने मैदानात उतरणार, रॅलीव्दारे करणार शक्तिप्रदर्शन, दीपक मानकर यांची माहिती

by sachinsitapure

पुणे : Deepak Mankar On PM Modi Sabha in Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रचारसभा उद्या २९ एप्रिल रोजी रेसकोर्स, पुणे (Pune Race Course) येथे होणार आहे. महायुतीचे पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तसेच बारामती (Baramati Lok Sabha), मावळ (Maval Lok Sabha) आणि शिरुर या लोकसभा मतदार संघातील (Shirur Lok Sabha) उमेदवारांसाठी पंतप्रधानांची ही सभा होत आहे. सभेची जय्यत तयारी भाजपाने (BJP) केली आहे. दरम्यान, महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (Ajit Pawar NCP) ही सभा यशस्वी करण्यासाठी मोठी ताकद लावण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होणाऱ्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार आहे. हजारो कार्यकर्त्यांसह भव्य रॅलीव्दारे शक्तिप्रदर्शन करत सभेला जाणार आहोत.

पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभेच्या नियोजनासाठी नारायण पेठ (Narayan Peth Pune) येथील गुप्ते मंगल कार्यालयात (Gupte Mangal Karyalaya) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारी बैठक झाली.

या बैठकीबाबत माहिती देताना दीपक मानकर म्हणाले, पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. काल झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या समोर मी मोदींजीच्या सभेला हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी होणार असल्याची माहिती दिली.

दीपक मानकर म्हणाले, नारायण पेठेत नदीपात्रालगत भिडे पुलापासून दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह भव्य रॅलीव्दारे रेसकोर्स मैदानावर पोहोचणार आहोत.

Solapur Lok Sabha | राम सातपुतेंना ‘उपरा’ म्हणत प्रणिती शिंदेंचे भाजपवर टीकास्त्र

Related Posts