IMPIMP

Anti Corruption Bureau Kolhapur | गुन्ह्यात मदत करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे लाच मागणारा पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइनदाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे (Builder) 10 हजार रुपयांची लाच
मागणाऱ्या (Demand of Bribe) लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील (Laxmipuri Police Station) एका पोलीस कॉन्स्टेबलला (Police Constable)
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) अटक केली. ही कारवाई आज (सोमवार) करण्यात आली आहे.
कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) केलेल्या या कारवाईमुळे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खळबळ
उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दिग्विजय पांडुरंग मर्दाने Digvijay Pandurang Mardane (वय-35 रा. शिंगणापूर, ता. करवीर) असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अनिल धीरज साखळकर Anil Dheeraj Sakhalkar (रा. नागाळा पार्क) यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Kolhapur) तक्रार दिली आहे. मर्दाने यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागाळा पार्क (Nagala Park) येथील बांधकाम व्यावसायिक अनिल साखळकर यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास दिग्विजय मर्दाने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याचे आमिष दखवून मर्दाने याने व्यावसायिकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 25 हजार रुपये मर्दाने याने घेतले होते.

 

 

उर्वरित 25 हजार रुपयांसाठी मर्दाने यांनी बांधकाम व्यावसायिक साखरकर यांच्याकडे तगादा लावला होता. अखेर 25 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये देण्याचे ठरले. साखळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant) यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. 27 डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली होती. त्यामध्ये यापूर्वी 25 हजार रुपये लाच स्विकारल्याचे आणि उर्वरित रक्कमेची मर्दाने याने मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल मर्दाने याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title : Anti Corruption Bureau Kolhapur | police constable Digvijay Pandurang Mardane arrested in bribe case in kolhapur

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | शरद पवारांच्या मेट्रो ट्रायलनंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल, म्हणाले – ‘आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?’

Mumbai Crime | IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याची होस्टेलच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, सुसाईड नोट सापडल्यानं प्रचंड खळबळ

Maratha Reservation | सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही – संभाजीराजे

 

Related Posts