IMPIMP

Mumbai Crime | IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्याची होस्टेलच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, सुसाईड नोट सापडल्यानं प्रचंड खळबळ

by nagesh
Mumbai Crime | student of iit bombay died by suicide by jumping from the hostels 7th floor

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Mumbai Crime | देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बे च्या (IIT Bombay) विद्यार्थ्याने काल रात्री (Mumbai Crime) आत्महत्या केली आहे. सूत्रानुसार असे समोर आले आहे कि विद्यार्थ्याने पहाटे साडेचारच्या सुमारास वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide in Mumbai) केली आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली असल्याचे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले आहे. सुसाईड नोटमध्ये तो डिप्रेशनमध्ये होता व त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यांनी कोणालाही जबाबदार धरले नाही. पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आत्महत्या करणारा 26 वर्षीय विद्यार्थी इंजिनीअरिंगच्या मास्टर्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.
घटना स्थळाहून त्याला तातडीने मुंबईतील राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) दाखल करण्यात आले व तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सूत्रानुसार असे समोर आले आहे कि हा विद्यार्थी डिप्रेशनचा शिकार झाला होता.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावामागे काय कारण होते, याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Mumbai Crime)

 

 

Web Title :  Mumbai Crime | student of iit bombay died by suicide by jumping from the hostels 7th floor

 

हे देखील वाचा :

Pune Police Helpline | पोलीस मदतीसाठी डायल 112 योजना ! 7 व्या मिनिटाला मिळणार पोलीस मदत

BSF Officer | बीएसएफ अधिकाऱ्याकडे मिळालं घबाड ! 14 कोटी रोख, दागिने आणि 7 महागड्या गाड्या

EPFO Withdraw Rule | पीएफ सदस्य दुसर्‍यांदा सुद्धा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स, जाणून घ्या काय आहे पद्धत?

 

Related Posts