IMPIMP

Asaduddin Owaisi | ‘मेरठ येथून परत येताना गाडीवर गोळीबार, 4 राऊंड केले फायर’ – असदुद्दीन ओवेसींचा दावा

by nagesh
Asaduddin Owaisi | firing on asaduddin owaisi car in meerut uttar pradesh

मेरठ : वृत्तसंस्थाAsaduddin Owaisi | एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी (MIM Chief Asaduddin Owaisi) यांनी ट्वीट करुन दावा केला आहे की, त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून चार राऊंड फायर (Four Rounds Fire) करण्यात आले आहेत. या हल्ल्यात (Asaduddin Owaisi Vehicle Attacked) आपण सुखरुप असल्याचे ओवेसी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ओवेसी यांनी ट्विट करताना गाडीचा फोटो शेअर केला आहे. (Asaduddin Owaisi)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मेरठहून परतत असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. ‘काही वेळापूर्वी चिजारसी टोल नाक्यावर गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. 4 राऊंड फायर करण्यात आले. 3 ते 4 लोक होते. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर हातातील शस्त्र त्याच ठिकाणी टाकून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली आहे. मात्र मी दुसऱ्या गाडीने तेथून निघून आलो. आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. अलहमदुलिल्लाह’

 

 

 

ओवेसी यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समजताच पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मेरठचे आयजी (IG) म्हणाले, टोल नाक्यावर ओवेसी समर्थकांशी बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सध्या गोळीबार झाल्याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यांनी जो दावा केला आहे त्यासंदर्भात आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) तपासत आहोत. तपासामध्ये खर काय ते समोर येईल.

 

Web Title :- Asaduddin Owaisi | firing on asaduddin owaisi car in meerut uttar pradesh

 

हे देखील वाचा :

Pune News | बहिणीने वाचवला भावाचा जीव ! स्वतःचे यकृत देत भावाला दिले जीवदान

Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4136 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indian Currency | तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खरी की बनावट, अशी ओळखा

 

Related Posts