IMPIMP

Indian Currency | तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खरी की बनावट, अशी ओळखा

by nagesh
Indian Currency | indian currency 500 rupee note is real or fake how to identify AS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Indian Currency | आजकाल बाजारापासून बँकेपर्यंत सर्वत्र खोट्या नोटांची चलती आहे. अनेकवेळा ग्राहक पैसे घेऊन बँकेत जातात तेव्हा त्यांना नोटा बनावट असल्याचे कळते. त्याचप्रमाणे अनेक वेळा ग्राहकांना एटीएममधून बनावट नोटा मिळतात. अशा स्थितीत, खर्‍या आणि बनावट नोटा कशा ओळखायच्या हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. साधारणपणे 500 ची नोट जास्त चलनात असते. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला 500 ची खरी नोट कशी ओळखायची ते सांगणार आहोत. (Indian Currency)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आरबीआयच्या अहवालानुसार 2020-21 या आर्थिक वर्षात 5.45 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत. एकूण 2,08,625 बनावट नोटा पकडण्यात आल्या आहेत, त्यापैकी 8107 नोटा म्हणजेच सुमारे 4 टक्के बनावट नोटा आरबीआयने पकडल्या आहेत, तर इतर बँकांनी 2,00,518 नोटा पकडल्या आहेत, म्हणजे सुमारे 96 टक्के बनावट नोटा.

 

500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 31.3% वाढ
गेल्या वर्षीच्या तुलनेत जप्त करण्यात आलेल्या 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 31.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या 30,054 नोटा जप्त करण्यात आल्या, तर 2020-21 या आर्थिक वर्षात 39,453 नोटा जप्त करण्यात आल्या.

 

मात्र, इतर प्रकारच्या बनावट चलनाच्या प्रमाणात घट झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांमध्ये 2, 5 आणि 10 ते 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. (Indian Currency)

 

500 रुपयांच्या नोटा कशा ओळखाल
तुमच्या खिशातील 500 रुपयांची खरी आणि बनावट ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. नोटाबंदीनंतर 500 रुपयांच्या जुन्या नोटांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आता तुम्हाला नवीन नोट ओळखायला शिकावे लागेल. आरबीआयने 500 रुपयांच्या नोटा ओळखण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत. ज्याद्वारे त्याची सहज ओळख होऊ शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खरी नोट अशी ओळखा
1. नोट उजेडात धरली असता 500 लिहिलेले दिसेल.

2. डोळ्यांसमोर 45 डिग्रीच्या अँगलमध्ये ठेवल्यास येथे 500 लिहिलेले दिसेल.

3. देवनागरीमध्ये 500 लिहिलेले दिसेल.

4. जुन्या नोटेच्या तुलनेत महात्मा गांधींच्या छायाचित्राचे ओरिएंटेशन आणि पोझिशन थोडी वेगळी आहे.

5. नोट थोडी दुमडल्यास सिक्युरिटी थ्रेडचा कलर हिरव्यातून निळा होतो.

6. जुन्या नोटांच्या तुलनेत गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सिग्नेचर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो डावीकडे शिफ्ट झाला आहे.

7. येथे महात्मा गांधींचे छायाचित्र आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्क आहे.

8. वर सर्वात डीवकडे आणि खाली सर्वात उजवीकडे लिहिलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.

9. येथे लिहिलेला नंबर 500 चा रंग बदलतो. याचा कलर हिरव्यातून निळा होतो.

10. डावीकडे अशोक स्तंभ आहे. डावीकडे सर्कल बॉक्स ज्यामध्ये 500 लिहिलेले आहे. डावीकडे आणि उजवीकडे 5 ब्लीड लाईन्स आहेत, ज्या खडबडीत आहेत.

 

* मागच्या बाजूला

11. नोटेच्या प्रिंटिंगचे वर्ष लिहिलेले आहे.

12. स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो.

13. मध्यवर्ती भागाकडे लँग्वेज पॅनल.

14. भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे छायाचित्र.

15. देवनागरीत 500 लिहिलेले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दृष्टिहीन व्यक्ती स्पर्शाने ओळखू शकते
भारतीय चलनावर दृष्टिहीन लोकांसाठी काही विशेष ओळखचिन्ह आहेत, जे ते स्पर्शाने ओळखू शकतात. 500 रुपयांच्या नोटेवर अशोक स्तंभाचे प्रतीक, महात्मा गांधींचे चित्र, ब्लीड लाइन आणि खडबडीत ओळख चिन्ह आहेत. जे दृष्टिहीन व्यक्तीला स्पर्शाने जाणवू शकते.

 

Web Title :- Indian Currency | indian currency 500 rupee note is real or fake how to identify AS

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अपहरण झालेल्या 5 वर्षाच्या मुलाची 3 तासात सुखरुप सुटका, आरोपी बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात

Baba Bhide Bridge | मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प ! पुण्यातील बाबा भिडे पूल होणार इतिहासजमा

Radhika Madan | प्रसिध्द अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा; म्हणाली – ‘मला शूटिंगच्या पहिल्याच दिवशी गर्भनिरोधक गोळी…’

 

Related Posts