IMPIMP

Pune Corona Update | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4136 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 41 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
वाढले आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 2 हजार 141 नवीन रुग्णांचे
निदान झाले आहे. तर 4 हजार 136 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 43 लाख 67 हजार 457 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 46 हजार 482 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 15 हजार 186 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 09 तर हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 270 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 22 हजार 026 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 288 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 50 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-invasive ventilator) 26 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 4.58 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Comfortable! 4136 patients of Corona discharged in Pune city in last 24 hours, find out more

 

हे देखील वाचा :

Indian Currency | तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खरी की बनावट, अशी ओळखा

Pune Crime | अपहरण झालेल्या 5 वर्षाच्या मुलाची 3 तासात सुखरुप सुटका, आरोपी बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात

Baba Bhide Bridge | मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प ! पुण्यातील बाबा भिडे पूल होणार इतिहासजमा

 

Related Posts