IMPIMP

Assembly Election results 2022 | काँग्रेसच्या पराभवानंतर शरद पवारांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण, दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले …

by nagesh
Sharad Pawar | NCP Chief sharad pawar to make the president of upa proposal in national executive meeting of ncp youth congress

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनAssembly Election results 2022 | पंजाब (Punjab), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाचही राज्यांमध्ये निवडणुकांनंतर आता निकाल हाती आले आहेत. पंजाब वगळता इतर सर्व राज्यांमध्ये भाजपला (BJP) सत्ता राखण्यास यश आले आहे. तर दुसरीकडे पंजाबमधील काँग्रेसच्या (Punjab Congress) अंतर्गत कलहाने मोठा पराभव झाला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) जोरदार मुसंडी मारत बहुमत मिळवले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसच्या पराभवाबाबत (Assembly Election results 2022) महत्त्वाचे निरीक्षण (Observation) नोंदवत काँग्रेसला सल्ला दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शरद पवार म्हणाले, काँग्रेस पक्षाचा 1977 साली यापेक्षा वाईट पद्धतीने पराभव झाला होता. मात्र त्यानंतर 1980 मध्ये देशातील जनतेने पुन्हा काँग्रेसला सत्ता दिली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाने पंजाबमध्ये झालेल्या पराभवाने (Assembly Election results 2022) लगेच नाउमेद होण्याचे कारण नाही. राजकीय पक्ष (Political Party) हे काही एका क्षणात संपत नाहीत. पण काँग्रेसच्या नेतृत्त्वाने आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांनी आपण कुठे कमी पडलो, कुठे एकत्र येण्याची गरज होती आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे होते, याचं आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे पवार यांनी म्हटले आहे.

 

तर जनता तुम्हाला स्विकारेल
काँग्रेसच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करुन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली तर जनता तुम्हाला पुन्हा स्विकारेल, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शरद पवार मुंबईत (Mumbai) पत्रकारांसोबत बोलत होते.

 

म्हणून काँग्रेसचा पराभव
पंजाबमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद (Internal Disputes) आणि केंद्र सरकारविषयी (Central Government) असलेल्या रागामुळे जनतेने आम आदमी पक्षाच्या बाजूने कौल दिला. तर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party) अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची चूक झाली असे वाटत नाही. अखिलेश यादव यांना मिळालेल्या जागा दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत, असेही शरद पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जनमताचा आदर केला पाहिजे
विरोधी पक्ष (Opposition) म्हणून आपण जनमताचा आदर केला पाहिजे. ईव्हीएम (EVM) संदर्भात अनेकांच्या तक्रारी आहेत.
पण मला याविषयी काही बोलायचे नाही. तेलंगणा (Telangana), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), केरळ (Kerala),
तामिळनाडू (Tamil Nadu), पश्चिम बंगाल (West Bengal), राजस्थान (Rajasthan) आणि महाराष्ट्रात (Maharashtra)
अजूनही बिगरभाजप सरकार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी (Budget Session)
सर्व विरोधी पक्ष दिल्लीत एकत्र जमतील तेव्हा देशात एक प्रभावशाली पर्याय देण्यासाठी
आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामतंर्गत (Common Minimum Program) एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

Web Title :- Assembly Election results 2022 | ncp chief sharad pawar reaction on assembly election results 2022

 

हे देखील वाचा :

UP Election Result 2022 | उत्तर प्रदेशात भाजपची पुन्हा सत्ता, पण ओवैसींच्या AIMIM चं काय झालं? जाणून घ्या

Goa Assembly Result | गोव्यात भाजपचा विजय ! फडणवीसांनी विजयाचे श्रेय दिले ‘या’ दोन व्यक्तींना, स्वत:चं नाव नाही घेतलं

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील मिळकतींना करात सवलत देण्याचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

 

Related Posts