IMPIMP

Aurangabad Crime | लग्नानंतर 8 महिन्यातच महिला इलेक्ट्रिक इंजिनिअरची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना

by nagesh
Pune Crime | Young woman commits suicide due to psychological distress after demanding money lent; Incidents in Chandannagar-Kharadi area

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन एका इंजिनिअर असलेल्या महिलेने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या (Commits suicide) केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad Crime) घडली आहे. मेघना सूर्यवंशी (Meghna Suryavanshi) असे आत्महत्या करणाऱ्या महिला इंजिनिअरचे नाव आहे. मेघना या इलेक्ट्रिक इंजिनिअर (Electric Engineer) होत्या. मेघना यांचा 8 महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. या घटनेने संपूर्ण औरंगाबाद शहरात (Aurangabad Crime) खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मेघना इलेक्ट्रिक इंजिनिअर होत्या. आठ महिन्यापूर्वी त्यांचा विवाह (marriage) अकुंश यांच्यासोबत झाला होता. अंकुश सूर्यवंशी (Ankush Suryavanshi) हा देखील इंजिनिअर आहे. अंकुश गुरुवारी कामावरुन घरी परतला तेव्हा मेघना घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तात्काळ मेघनाला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तिली मृत घोषित केलं.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मेघना आणि अंकुश यांचा फेब्रुवारी 2021 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये वाद सुरु झाले होते. असातच अंकुश याचे बाहेर अन्य मुलीसोबत अनैतिक संबंध (Immoral relations) असल्याचा संशय मेघनाला आला. यानंतर मेघनाने अंकुशचा मोबाईल तपासला असता फोनमध्ये त्या मुलीसोबत केलेली चॅटिंग दिसून आली. याबाबत तिने अंकुशला विचारले असता दोघांमध्ये कडाक्याचे भांडण (Aurangabad Crime) झाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या भांडणानंतर मेघनाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली, अशी चर्चा आहे.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या मेघनाच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार (Aurangabad Crime) दिला.
जोपर्यंत अंकुश विरोधात गुन्हा (FIR) दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही असा पवित्रा तिच्या नातेवाईकांनी घेतला.
त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून नातेवाईकांची समजूत काढली.
त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

 

Web Title :- Aurangabad Crime | electrical engineer Meghna Suryavanshi commits suicide after 8 months of marriage in aurangabad

 

हे देखील वाचा :

PM Garib Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये सरकारने दिली आणखी एक मोठी सुविधा; हजारो लोकांना होणार लाभ

Matchbox Price | 14 वर्षानंतर महागणार ‘काडेपेटी’, दुप्पट होतील दर; उत्पादकांनी सांगितले ‘हे’ कारण

Mumbai Cruise Drugs Case | चौकशीला जाण्याआधी अभिनेत्री अनन्या पांडेंची मोठी ‘गेम’; NCB अधिकारीही गोंधळात

 

Related Posts