IMPIMP

Awami Mahaz Pune | आझम कॅम्पस : ‘अवामी महाज’ च्या ईद मिलन मध्ये रंगली संगीत संध्या !

by nagesh
Awami Mahaz Pune | Azam Campus: ‘Awami Mahaj”s Eid Milan held a musical evening!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ‘अवामी महाज’ (Awami Mahaz Pune) सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प)च्या फंक्शन ग्राऊंड येथे हा कार्यक्रम उत्साहात, सौहार्दाच्या वातावारणात पार पडला. ‘संगीत संध्या’ या संगीतमय कार्यक्रमाने रंग भरले. ‘अवामी महाज’ (Awami Mahaz Pune) चे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार (Dr. P. A. Inamdar) यांनी स्वागत केले.

मंजुश्री ओक आणि सहकाऱ्यांनी जुनी हिंदी गीते, सुफी गीते तरलपणे सादर केली.

‘मौला मेरे मौला’, ‘आईये मेहरबाँ’, ‘खुदा ने आसमाँ से ‘, ‘ये समा’,’ मैने पुछा चाँदसे ‘, ‘सुहानी रात ढल चुकी ‘ , ‘ दर्द से मेरा दामन भर दे अल्ला ‘ अशा एकाहून एक सरस गीतांची बरसात गायकांनी केली आणि हिंदी सिनेसृष्टीचा, संगीताचा सुवर्णकाळच उपस्थितांसमोर उभा झाला ! (Awami Mahaz Pune)

ज्येष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar), माजी मंत्री रमेश बागवे (Former Minister Ramesh Bagwe), आबेदा इनामदार (Abeda Inamdar), अभय छाजेड (Abhay Chhajed), प्रशांत जगताप (Prashant Jagtap), वीरेंद्र किराड, रवींद्र माळवदकर, साईनाथ बाबर, नारायण लोणकर, एस.ए. इनामदार,नुरुद्दीन अली सोमजी, मुकुंद किर्दत, श्रीपाद ललवाणी, डॉ. काझी, प्रा. इरफान शेख, वाहिद बियाबानी, अंजुम इनामदार, शाहीद शेख, राहुल डंबाळे, बबलू सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘अवामी महाज’चे पदाधिकारी,सदस्यांनी संयोजन केले.

Web Title :- Awami Mahaz Pune | Azam Campus: ‘Awami Mahaj”s Eid Milan held a musical evening!

हे देखील वाचा

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा

Ali Daruwala | अली दारूवाला यांचा केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते पुण्यात सत्कार

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : दुर्देवी : शेततळयात बुडून बापलेकाचा मृत्यु, मदत मिळाल्याने आई वाचली

Related Posts