IMPIMP

‘या’ 4 कारणामुळे बंद होऊ शकते Bank Account, करंट आणि सेव्हिंग अकाऊंट वापरताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

by nagesh
NPS Or EPF Which Is Better | nps or epf which is better for your retirement planning

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBank Account | जनधन खाते (JanDhan Account) उघडल्यानंतर देशात खातेधारकांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त झाली आहे. अनेक लोकांकडे एकापेक्षा जास्त बचत आणि चालू खाती (Savings And Current Account) आहेत. त्यांचा वापर करण्यासाठी खातेधारकांकडे डेबिट कार्ड (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि इंटरनेट बँकिंगची (Internet Banking) सुविधा आहे. बँक खात्याच्या मदतीने, लोकांना पैशांचे व्यवहार करणे देखील खूप सोयीचे आहे. (Bank Account)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पण काही चुका अशाही आहेत ज्यामुळे तुमचे बचत आणि चालू खाते बंद होऊ शकते. जर तुम्हाला कोणताही त्रास टाळायचा असेल तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा.

 

1. ट्रांजक्शन न झाल्यास बंद होते खाते
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमानुसार, जर खातेदाराने दोन वर्षांपर्यंत खात्यात कोणताही व्यवहार केला नाही तर त्याचे खाते निष्क्रिय होते. बँक असे खाते निष्क्रिय यादीत टाकते. त्याचबरोबर या खात्यांवर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही.

 

2. वेळेवर KYC अपडेट न करणे
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, खातेदाराला तीन वर्षांच्या अंतराने त्याच्या बँकेच्या शाखेत केवायसी अपडेट करावे लागते. तुम्ही वेळेवर बँकेत जाऊन केवायसी अपडेट न केल्यास तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. अशावेळी तुमचे इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्ड ब्लॉक होऊ शकते. (Bank Account)

 

3. कोणत्याही पुराव्याशिवाय खात्यात पैसे आले तर
कोणत्याही स्रोताची योग्य माहिती नसताना जर खातेदाराच्या खात्यात मोठी रक्कम आली तर अशावेळी खाते गोठवले जाऊ शकतो.

उदाहरणार्थ, एखाद्याच्या खात्यात अचानक 10 कोटी रुपये आले, ज्याचा स्रोत त्याच्याकडे नाही. तर अशावेळी बँकेला असे खाते गोठवण्याचा अधिकार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. संशयास्पद ट्रांजक्शनच्या बाबतीत –
बँक खात्यात खातेदार किंवा अन्य कुणीही संशयास्पद व्यवहार (Suspicious Transaction) केला तर खाते गोठवले जाऊ शकते.
उदाहरणार्थ, परदेशातून तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आणि पाठवणारा तुम्हाला ओळखत नसेल, तर अशावेळी बँक तुमचे खाते गोठवू शकते.

 

Web Title :- Bank Account | bank account closed due to these reasons keep this thing in mind while using current and savings account

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | ‘भाजपला राज्यात येऊ देणार नाही, मात्र…’; युवा आमदारांना शरद पवारांचा सल्ला

Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरणात चांदिवाल आयोगाचा तपास पूर्ण, अनिल देशमुखांना क्लिन…?

Pune Crime | मित्रच बनला वैरी, दगडाने ठेचून एकाचा खून ! आरोपी शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात

 

Related Posts