IMPIMP

Bank Account Problem | पैसे चुकून अनोळखीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालेत का? जाणून घ्या कसे परत मिळतील

by nagesh
Bank Account Problem | money transferred to unknown account by mistake know how to get the amount back

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Bank Account Problem | लोक बँकेच्या खात्यात पैसे सुरक्षित ठेवतात, जेणेकरून गरज पडल्यास उपयोगी पडतील. सोबतच आजच्या काळात मनी ट्रान्सफर अ‍ॅपने एका खात्यातून दुसर्‍या खात्यात सुद्धा पैसे पाठवले जात (Bank Account Problem) आहेत. तर ऑनलाइन बँकिंगद्वारे सुद्धा पैशांचा व्यवहार करण्यात येत आहे. अशावेळी चूक होण्याची शक्यता असू शकते. जर चुकीचा अकाऊंट नंबर किंवा इतर चुकीच्या माहितीमुळे तुमचे पैसे जिथे जायला हवेत तिथे न जाता अन्य खात्यात गेले तर समस्या होऊ शकते (If money transferred to the wrong account).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

तुम्ही डिजिटली पैसे ट्रान्सफर केले असतील किंवा बँकेत जाऊन पैसे पाठवलेले असो, येथे काही अशा पद्धती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे पैसे थेट तुमच्याकडे पोहचू शकतात. यासाठी तुम्हाला खाली सांगितलेले नियम जाणून घ्यावे लागतील.

 

चुकून पाठवलेले पैसे कसे परत मिळवावे?

– ताबडतोब बँक आणि स्थानिक बँक व्यवस्थापनाशी संपर्क करा आणि त्यांना तुम्ही केलेल्या चुकीच्या व्यवहाराचा तपशील वेळ, खाते आणि लाभार्थीच्या इच्छित खात्यासारखी माहिती द्या. (Bank Account Problem)

– यानंतर बँक त्या बँकेच्या शाखेचा तपशील देईल, जिथे पैसे गेले आहेत. तुम्ही त्या बँकेला ट्रांजक्शन रिव्हर्सलसाठी सांगू शकता.

– जर रक्कम त्याच बँकेत चुकीच्या व्यक्तीकडे गेली, तर बँक त्या व्यक्तीसोबत संपर्क साधू शकते आणि व्यवहार बदलण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी मागू शकते.

– व्यवहाराच्या बाबतीत बँकांच्या सर्व तपशीलांचा व्यक्तीगत रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आणि नियमानुसार आहे.

– चुकून ज्याच्या खात्यात पैसे गेले आहेत त्या व्यक्तीने पैसे ट्रान्सफर झालेले पैसे परत करण्यास नकार दिला तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, यासाठी बँकेद्वारे माहिती दिली जाऊ शकते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

चुकीचा व्यवहार कसा टाळावा?

– व्यवहार करताना IFSC कोड आणि बँक खाते क्रमांकबाबत योग्य माहिती द्या.
व्यवहार करण्यापूर्वी दोन-तीन वेळा माहिती तपासून पहा.

– ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी एक छोटी रक्कम जसे की, 1 ते 10 रुपयांचे ट्रांजक्शन करू शकता.
जेणेकरून हे समजू शकते की तुम्ही जी रक्कम पाठवली आहे ती योग्य ठिकाणी जात आहे किंवा नाही.

– स्थानिक बँकेच्या संपर्काची माहिती ठेवा. कारण एखादी चूक झाल्यास बँक तातडीने लाभार्थीला कळवू शकते
आणि पैसे परत मिळवण्यासाठी मदत करू शकते.

 

Web Title :- Bank Account Problem | money transferred to unknown account by mistake know how to get the amount back

 

हे देखील वाचा :

Uric Acid | किमोथेरपीने वाढू शकतो यूरिक अ‍ॅसिडचा धोका, जाणून घ्या कसे कराल नियंत्रण

Monalisa Bold Dance | मोनालिसानं बोल्ड ड्रेस घालून, पावसामध्ये भिजत केला डान्स (व्हिडिओ)

Sawai Gandharv Bhimsen Mahotsav | 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान

 

Related Posts