IMPIMP

Bengaluru Smashers – Punit Balan | अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत आता बंगळूर स्मॅशर्स नवा संघ; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे संघाची मालकी

by Team Deccan Express
Bengaluru Smashers - Punit Balan | Bangalore Smashers New Team in Ultimate Table Tennis Tournament; Young entrepreneur Punit Balan owns the team

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Bengaluru Smashers – Punit Balan | ‘अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा’ Ultimate Table Tennis (UTT) तीन वर्षानंतर पुन्हा एकदा भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेत ‘बंगळूर स्मॅशर्स’ या नव्या संघाचाही समावेश असणार आहे. युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या (Punit Balan Group) मालकीचा हा संघ असून यानिमित्ताने त्यांनी क्रीडा क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. (Bengaluru Smashers – Punit Balan)

 

पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात (Pune Balewadi Stadium Table Tennis) दि. १३ ते ३० जुलै २०२३ या कालावधीत या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील खेळाडूंचा सहभाग असणार आहे. त्यामुळे क्रीडा रसिकांसाठी ही स्पर्धा मोठी पर्वणी असणार आहे. ‘भारतीय टेबल टेनिस फेडरेशन’च्यावतीने नीरज बजाज आणि विता दानी यांनी सर्वांत प्रथम २०१७ मध्ये या स्पर्धेच्या आयोजनाला सुरवात केली. या स्पर्धांचे सलग तीन हंगाम यशस्वीरित्या पार पडले. मात्र, २०२० साली कोरोनाच्या संकटामुळे ‘अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धे’ला ब्रेक लागला होता. आता पुन्हा नव्या दमाने या स्पर्धेच्या ४ थ्या हंगामाला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघामध्ये विजेतेपदासाठी झुंज होणार आहे. यामध्ये यू मुंबा, पुणेरी पलटण, गोवा चॅलेंजर्स, दबंग दिल्ली आणि कोलकाता हे संघ नेहमीप्रमाणे यंदाही कायम राहणार आहेत. तर चेन्नई लायन्सची जागा बंगळूर स्मॅशर्स या नव्या संघाने घेतली आहे. (Ultimate Table Tennis (UTT)

 

पुण्यातील युवा उद्योजक पुनित बालन यांच्या मालकिचा हा संघ असणार आहे. बालन हे अल्टिमेट खो-खो, टेनिस लीग, प्रीमियर बॅडमिंटन लीग आणि हँडबॉल लीगमधील फ्रँचायझीमध्ये गुंतवणूकदार आहेत. तसेच प्रिमीयर हँडबॉल लीगमध्ये महाराष्ट्र आयर्नमेन संघाचे स्वामित्वही त्यांच्याकडे आले आहे.

‘‘जगभरात ओळख असलेल्या आणि नामांकित खेळांडुचा समावेश असलेल्या
‘अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धे’च्या निमित्ताने मला सहभाग मिळाला याचा आनंद होत आहे.
टेबल टेनिस भारतात आता लोकप्रिय खेळ होत आहे.
त्याच्या प्रचारासाठी आम्ही यामाध्यमातून आणखी योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यामुळे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची संधीही मिळाली आहे.’’

– पुनीत बालन
(मालक, बंगळूर स्मॅशर्स संघ)
(Owner, Bangalore Smashers Team)

 

Web Title :   Bengaluru Smashers – Punit Balan | Bangalore Smashers New Team in Ultimate Table Tennis Tournament; Young entrepreneur Punit Balan owns the team

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts