IMPIMP

CM Eknath Shinde Ayodhya Tour | ‘कमीशन खाऊन केलेली पापं धुण्यासाठी अयोध्येला जात नाही’, रामदास कदमांचा राऊतांना टोला म्हणाले-‘तुमचं नशीब…’

by nagesh
CM Eknath Shinde Ayodhya Tour | ramdas kadam attacks on sanjay raut over ayodhya rally comment

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – CM Eknath Shinde Ayodhya Tour | शिंदे गटाला शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण
(Dhanushyaban Symbol) मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार,
आमदार आणि नेते आहेत. काही कार्यकर्ते रेल्वे तर काही विमानाने अयोध्येला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर (CM Eknath Shinde
Ayodhya Tour) विरोधकांकडून टीका होत आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि विरोधकांनी केलेल्या टीकेला रामदास कदम (Ramdas
Kadam) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याला (CM Eknath Shinde Ayodhya Tour) पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, अयोध्येला आम्ही का जाऊ नये, आम्ही श्रीरामाचं (Lord Shri Ram) दर्शन घेणं हा पब्लिसिटी स्टंट कसा काय? मुळात अयोध्येत जाऊन दर्शन घेणे पाप आहे का? अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) सत्ता असताना कमिशन खाऊन ज्यांनी पापं केली ती पापं धुण्यासाठी आम्ही अयोध्येला जात नाही. ती पापं धुण्यासाठी तुम्ही जायला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

 

रामदास कदम पुढे म्हणाले, ते आमच्या दौऱ्याला पब्लिसिटी स्टंट (Publicity Stunt) म्हणत आहेत. अयोध्येत लावण्यात आलेल्या बॅनर्सवर ते बोलत आहेत. मात्र, ते बॅनर्स आम्ही लावले नाही. ते बॅनर्स तेथील लोकांनी लावले आहे. ही गोष्ट सगळ्यांच्या नशिबात नसते. राऊत साहेब तुमचं नशीब फुटकं आहे, अशा शब्दांत कदम यांनी संजय राऊतांवर घणाघात केला.

 

काश्मीर मधील कलम 370 हटवाव आणि अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) बांधाव ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray) यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केलं आहे. आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे. आता त्याठिकाणी राम मंदिर बांधलं जात आहे. त्यामुळे आम्ही प्रभू श्रीरांम यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी अयोध्येला जात असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  CM Eknath Shinde Ayodhya Tour | ramdas kadam attacks on sanjay raut over ayodhya rally comment

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभेद?, शरद पवारांच्या भूमिकेवर नाना पटोले म्हणाले -‘…तर त्यांची भूमिका त्यांना लखलाभ’

Pune PMC – Uruli Devachi – Fursungi | गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका किंवा महापालिका निर्माण करण्याची मागणी ‘राजकियच’ !

CM Eknath Shinde | अयोध्येला निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा, म्हणाले-‘मला जुन्या विषयांवर बोलायला…’ (व्हिडिओ)

 

Related Posts