IMPIMP

Best Multibagger Stock | ‘या’ कंपनीच्या शेअरची कमाल, 15 दिवसात पैसे केले डबल

by nagesh
Multibagger Penny Stock | raj rayon industries stock hits 52 week high today delivered 558 percent return in 38 days

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBest Multibagger Stock | अक्षय कुमारच्या ’फिर हेरा फेरी’ चित्रपटातील एक मीम खूप प्रसिद्ध आहे – 25 दिवसात पैसे दुप्पट… तुमच्यापैकी अनेकांना असे वाटेल की हे चित्रपटांमध्ये घडते, प्रत्यक्षात तसे नाही. आज आम्ही तुम्हाला अशा मल्टीबॅगर स्टॉकबद्दल (Best Multibagger Stock) सांगणार आहोत ज्याने केवळ 15 ट्रेडिंग सत्रांमध्ये म्हणजेच स्टॉक मार्केटच्या 15 ट्रेडिंग दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ऑफलाइन आणि ऑनलाइन लर्निंग सोल्यूशन देणारी कंपनी व्हेरांडा लर्निंग सोल्युशन्सने अलीकडेच त्यांचा आयपीओ लॉन्च केला. कंपनीच्या शेअर्सच्या लिस्टिंगनंतर, फक्त 15 ट्रेडिंग दिवसात, त्याची किंमत आयपीओच्या किमतीपेक्षा 101% वाढली. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या आयपीओमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आता त्याला 2.01 लाख रुपये परत मिळाले असते. (Best Multibagger Stock)

 

इतका वाढला व्हेरांडाच्या शेअरचा भाव

आयपीओसाठी, कंपनीने शेअरची किंमत (Veranda Learning Solutions IPO Price) 137 रुपये निश्चित केली होती. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात तो रु. 276.65 वर बंद झाला. म्हणजेच अवघ्या 15 ट्रेडिंग दिवसांत शेअरच्या किमतीत 139 रुपयांची वाढ झाली आहे.

 

प्रीमियमवर लिस्ट झाला होता शेअर

Veranda Learning Solutions चा आयपीओ 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान आला.
याची किंमत 130 ते 137 रुपये होती. कंपनीचे शेअर्स 5 एप्रिल रोजी वाटप करण्यात आले आणि 11 एप्रिल रोजी लिस्ट झाला.
कंपनीचा शेअर्स त्याच्या इश्यू किमतीच्या 14.60% प्रीमियमवर लिस्ट झाला होता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीनुसार लक्ष्य ठरवले पाहिजे.
तसेच, कोणत्याही कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्यावा.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Best Multibagger Stock | best multibagger stock veranda learning solutions makes investors money double in just 15 trading sessions

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर निशाणा; म्हणाले – ‘मी मुंबईचा मराठी माणूस, हे शहर आमच्या बापाचं’

Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

Pune Crime | पालखीला खांदा देण्याच्या मानावरुन जांभुळवाडीत दोन गटात तुंबळ हाणामारी आणि राडा ! 12 जणांवर गुन्हा

 

Related Posts