IMPIMP

Bigg Boss Marathi 4 Winner | बिग बॉस मराठी 4 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर अक्षय केळकरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

by nagesh
Akshay Kelkar | bigg boss marathi 4 grand finale akshay kelkar winner total winning amount know how much money he got

सरकारसत्ता ऑनलाईन  – Bigg Boss Marathi 4 Winner | बिग बॉस मराठी 4 च्या पर्वाचा 8 जानेवारी रोजी समारोप झाला. या महाअंतिम सोहळ्याची स्पर्धा अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि किरण माने यांच्यामध्ये रंगली. या स्पर्धकांमधून सर्वाधिक मतं मिळवून ज्या स्पर्धकाने ट्रॉफीवर नाव कोरलं, त्याच नाव आहे – अक्षय केळकर ! (Bigg Boss Marathi 4 Winner)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अपूर्वा नेमळेकर आणि आणि अक्षय केळकर (Akshay Kelkar) या टॉप २ स्पर्धकांमध्ये महाअंतिम सोहळा रंगला.आधी महेश मांजरेकरांनी अक्षयला ‘बेस्ट कॅप्टन’ हा पुरस्कार देत 5 लाखाचा चेक देऊ केला. अक्षय 15 लाख 55 हजार रक्कम आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्याकडून 10 लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचरही त्याला मिळाले.अपूर्वाला हरवून अक्षयने बिग बॉस मराठी 4 या पर्वाची ट्रॉफी जिंकली.अक्षयचे बिग बॉस मराठीचे हे पर्व जिंकताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. (Bigg Boss Marathi 4 Winner)

 

 

यानंतर अक्षयने एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार मी अक्षय केळकर, आज फक्त अन् फक्त तुमच्यामुळे मी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरलोय. मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. त्याबरोबर मी माझे लक्ष्यदेखील पूर्ण केले. त्याबद्दल मी प्रेक्षकांचे, कलर्स मराठीचे, महेश मांजरेकर, घरातील सर्व सदस्यांचे, बिग बॉसच्या बॅकस्टेज टीमचे सर्वांचेच आभार. असे म्हणत त्याने सगळ्यांचे आभार मानले .

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टॉप 5 स्पर्धकांपैकी पहिल्यांदा बाहेर पडली राखी सावंत आणि ते ही 9 लाख रुपये घेऊन! बिग बॉसने अशी संधी दिली होती की 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडता येईल.
हे एकत्र 9 लाख रुपये मिळतील किंवा काहीच नाही असा पर्याय ठेवण्यात आला.
हे 9 लाख रुपयांची निवड करत राखी सावंत घराबाहेर पडली. राखीनंतर अमृता धोंगडे घराबाहेर पडली.
यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे टॉप २ सदस्य हे अपूर्वा नेमळेकर
आणि अक्षय केळकर ठरले.त्यानंतर घरातील उरलेले दोन सदस्य अपूर्वा आणि अक्षय लाईट बंद करून बाहेर
आले होते आणि महेश सरांनी अपूर्वा आणि अक्षय यांना स्टेजवर बोलावलं आणि विजेत्याचं नाव घोषित केलं.

या महाअंतिम सोहळ्यात टॉप 5 स्पर्धकांसह याआधी बाहेर पडलेल्या स्पर्धकांचेही धमाकेदार परफॉरमन्स
पाहायला मिळाले. कलर्स मराठीवर सुरू होत असलेल्या’रमा-राघव’ ह्या नवीन मालिकेतील,
रमा आणि राघव यांनीही या कार्यक्रमात परफॉर्मन्स दिला.

 

Web Title :- Bigg Boss Marathi 4 Winner | bigg boss marathi 4 winner akshay kelkar first reaction after win the show

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यात उपचारासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार

MP Vinayak Raut | राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर खासदार विनायक राऊतांची टीका, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी सुपारी घेऊन…’

Pune News | सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

 

Related Posts