IMPIMP

Pune Crime News | पुण्यात उपचारासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार

by nagesh
Pune Crime News | A woman who came for treatment in Pune was raped at gunpoint

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | उपचारासाठी अनेक दिवस रहावे लागणार असल्याने भाड्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी संजय बाजीराव भोसले (वय ५२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याला अटक केली आहे. याबाबत गाझीयाबाद येथील एका ३९ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५३/२३) दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील जयप्रकाश सोसायटीत ५ जानेवारी रोजी दुपारी घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीयाबाद येथील एक महिला मणक्याचा त्रास असल्याने उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आल्या होत्या. अनेक दिवस उपचार घ्यायचे असल्याने त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम पाहिजे होती. त्यांनी संजय भोसले यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन त्यांना जयप्रकाश सोसायटीत नेले. तेथे त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेईन, अशी धमकी दिली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | A woman who came for treatment in Pune was raped at gunpoint

 

हे देखील वाचा :

MP Vinayak Raut | राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर खासदार विनायक राऊतांची टीका, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी सुपारी घेऊन…’

Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स

Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह निळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे एकदम झक्कास; फोटो व्हायरल

 

Related Posts