IMPIMP

MP Vinayak Raut | राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर खासदार विनायक राऊतांची टीका, म्हणाले – ‘राज ठाकरेंनी सुपारी घेऊन…’

by nagesh
MP Vinayak Raut | shiv sena mp vinayak raut has severely criticized mns chief raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना एकदोन उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरु केलेत. महाराष्ट्रातून एक नाही तर पाच मोठे उद्योग गुजरातमध्ये गेले. त्या उद्योगांच्या जीवावर भाजपने (BJP) गुजरातची निवडणूक (Gujarat Election) जिंकली आहे, अशी टीका विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राज ठाकरेंवर केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘व्यंग ,वास्तव आणि राजकारण’ या विषयावर 18 वे जागतिक मराठी साहित्य संमेलनात (Jagtik Marathi Sammelan) ‘शोध मराठी मनाचा’ या परिसंवादात राज ठाकरे यांची प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर यांनी मुलाखत (Interview) घेतली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

 

काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. एखादा दुसरा उद्योग बाहेर गेल्यानं राज्याचे फार नुकसान होणार नाही, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील प्रत्येक राज्याकडे समान बघितले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधानांना शोभत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. एखाद्या भूमिकेला राजकारणात विरोध करणे चुकीचे नाही. चांगले काम केले तर त्यांचे कौतुक केले पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले.

 

महाराष्ट्राला कंगाल केलं

महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर नेले आणि महाराष्ट्राला कंगाल केले.
राज ठाकरे यांना त्यावर बोलायला वेळ नाही हे मनसेचं दुर्दैव. राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरु केलेत.
महाराष्ट्रातील दोन नाही तर पाच मोठे उद्योग गुजरातमध्ये गेले.
याच उद्योगांच्या जीवावर भाजपने गुजरातची निवडणूक जिंकली, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Vinayak Raut | shiv sena mp vinayak raut has severely criticized mns chief raj thackeray

 

हे देखील वाचा :

Aadhaar Card Security | आधार धारकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ टिप्स फॉलो करून आधार डाटा ठेवा सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स

Pune News | सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह निळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे एकदम झक्कास; फोटो व्हायरल

 

Related Posts