IMPIMP

BJP MLA Ganesh Naik | आमदार गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार, नाईक देशाबाहेर पळून जाण्याचा पोलिसांना संशय; विमानतळ प्रशासन सतर्क

by nagesh
BJP MLA Ganesh Naik | bjp mla ganesh naik disposed of rape and intimidation case

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइनभाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांचे दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले (Pre-Arrest Bail Application Rejected) आहेत. त्यामुळे आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांच्यावर रिव्हॉल्वर (Revolver) दाखवून धमकी (Threat) देणे तसेच बलात्काराच्या (Rape) आरोपाखाली गुन्हे (FIR) दाखल झाले आहेत. त्यानंतर नाईक यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. त्यांचे दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) फेटाळून लावले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उच्च न्यायालयात जाण्यासाठी सात दिवसांचे अंतरिम संरक्षण देण्याची नाईक यांच्या वकिलांची मागणी देखील न्यायालयाने अमान्य केल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक परदेशात (Leave Country) पळून जाऊ शकतात, असा पोलिसांना (Mumbai Police) संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी विमानतळ प्रशासनाला (Airport Administration) सतर्क (Alert) राहण्याच्या सूचना केल्या आहेत. परिणामी आमदार नाईक यांच्या अडचणीत भर पडली आहे. दरम्यान, अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी गणेश नाईक हे लवकरच उच्च न्यायालयात (High Court) धाव घेण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?
आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्या विरोधात एका महिलेने लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याची नेरुळ पोलीस ठाण्यात (Nerul Police Station) तक्रार दाखल केली आहे.
त्यामुळे पोलिसांनी नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिला 1993 मध्ये वाशी सेक्टर – 17 मधील एका क्लब मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती.
त्यावेळी नाईक वारंवार क्लबमध्ये बैठकीसाठी येत होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये ओळख झाली.
1995 मध्ये ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
नाईक यांनी मला पारसिक हिल (Persian Hill) येथील बंगल्यात नेऊन शरीर संबंध प्रस्थापित केले.
पुण्यात फिरण्यासाठी गेल्यानंतरही आमच्यामध्ये संमतीने शरीर संबंध प्रस्थापित झाले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नोव्हेंबर 2006 मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर सहाव्या महिन्यात एप्रिल 2007 मध्ये त्यांच्या सांगण्यावरुन मी न्यू जर्सी (New Jersey) येथे राहण्यास गेले आणि 18 ऑगस्ट 2007 मध्ये मुलाला जन्म दिला.
तो दोन महिन्याचा असताना नाईक स्वत: मला व मुलाला घेण्यासाठी अमेरिकेत (United States) आले होते.
त्यानंतर त्यांनी आम्हाला नेरुळमधील सी ब्रीज टॉवर (Seabridge Tower) इमारतीत राहण्यास नेले.
ते आठवड्यातून तीन वेळा घरी येत होते. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लैंगिक शोषण केले,
असा या महिलेचा आरोप आहे.

Web Title :- BJP MLA Ganesh Naik | BJP MLA ganesh naik preparing to leave the country airport administration alert

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai on Narayan Rane | ‘राणे पिता-पुत्रांची किंमत म्हणजे मायनस शून्य’; शंभूराज देसाईंचं राणेंना प्रत्युत्तर

Nana Patole on Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा जो तमाशा सुरू केलाय तो थांबवावा’ – नाना पटोले

Fatty Liver Symptoms | लिव्हर खराब झाल्याने तोंडातून येईल भयंकर दुर्गंधी, लवंग-वेलची खाण्याऐवजी डॉक्टरांकडे घ्या धाव

Related Posts