IMPIMP

Shambhuraj Desai on Narayan Rane | ‘राणे पिता-पुत्रांची किंमत म्हणजे मायनस शून्य’; शंभूराज देसाईंचं राणेंना प्रत्युत्तर

by nagesh
Shambhuraj Desai on Narayan Rane | shambhuraj desai slams narayan rane nitesh and nilesh rane

वाशिम : सरकारसत्ता ऑनलाइन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दहा वर्षे महाराष्ट्राला मागे नेल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण राणेंच्या (Shambhuraj Desai on Narayan Rane) टीकेला प्रत्युत्तर दिलं असून राणे पिता-पुत्रांना शिवसेना किंमत देत नसल्याचं त्यांनी (Shambhuraj Desai on Narayan Rane) म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवसेना राणे पिता पुत्रांना काहीच किंमत देत नसून आम्हीसुद्धा काहीच किंमत देत नाही. केंद्राने त्यांना दिलेली सुरक्षा ही राज्यात फिरुन शिवसेनेवर बोलण्यासाठी दिली आहे. मात्र त्याची किंमत म्हणजे मायनस शून्य असून त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचं म्हणत शंभूराज देसाई यांनी राणेंना खोचक टोला लगावला.

 

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेण्याचं काम केलं. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर घसरला आहे.
मंत्रालयात न येता सत्तेची पाच वर्षे कशी पूर्ण करणार ?, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला यांचा काहीच फायदा नाही, असं नारायण राणे म्हणाले होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त वर्ल्ड ट्रेड सेंटर (World Trade Center) येथील लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाच्या तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे मंत्री राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान बोलताना राणेंनी टीका केली होती.

 

दरम्यान, बाळासाहेब भोळे होते म्हणून त्यांचा गैरफायदा घेतला गेल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
यावर, जे साहेबांनी कमावलं, ते काहींना टिकवता आले नाही.
त्यामुळे त्यांच्यावर बोलूच नका कारण तो नैतिक अधिकार तुम्हाला नाही असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

 

Web Title :- Shambhuraj Desai on Narayan Rane | shambhuraj desai slams narayan rane nitesh and nilesh rane

 

हे देखील वाचा :

Nana Patole on Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा जो तमाशा सुरू केलाय तो थांबवावा’ – नाना पटोले

Fatty Liver Symptoms | लिव्हर खराब झाल्याने तोंडातून येईल भयंकर दुर्गंधी, लवंग-वेलची खाण्याऐवजी डॉक्टरांकडे घ्या धाव

Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकावर खुनी हल्ला करणार्‍याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

 

Related Posts